esakal | 'सोबत यायचं नव्हतं तर मग युती केलीच कशाला?'
sakal

बोलून बातमी शोधा

chandrakant patil

'सोबत यायचं नव्हतं तर मग युती केलीच कशाला?'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) नावाने मते मागायची. जागा निवडून आल्यानंतर ते घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडे (NCP) जायचे. उद्धव ठाकरेंना सोबत यायचं नव्हतं तर मग युती (Shivsena BJP alliance) केली कशाला? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी (BJP state president chandrakant patil) केला. ते सध्या विदर्भ दौऱ्यावर असून आज अमरावतीत बोलत होते.

हेही वाचा: ED कडे अनेक मंत्र्यांचा नंबर लागणार, चंद्रकांत पाटलांचा सरकारला इशारा

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठकारे यांची चार वाजता पत्रकार परिषद होती. त्यावेळी उद्धवजी स्वतः म्हणाले होते, की मी माझी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतो. त्यांनी ती पत्रकार परिषद घेतली आणि आम्हाला सर्व मार्ग खुले आहेत, असे त्यांनी सांगितले. त्यावेळी मी स्वतः साक्षीदार होते. मग त्यांनी युती केलीच कशाला? अशी टीका त्यांनी शिवसेनेवर केली.

उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला. विश्वासघातालच पाठीत खंजीर खुपसणे म्हणतात. आम्हाला आता कोणाच्या जाळ्यात सापडायचे नाही. आम्ही सर्व निवडणुका एकट्यानेच लढणार, असा निर्धारही चंद्रकांत पाटलांनी बोलून दाखविला. राज्यात कुठलीही घटना घडली तर त्यांचे डोके ठीक नाही. त्यांना झोप येत नाही. त्यांच्या पोटात दुखत आहे, असे महाविकास आघाडीचे नेते सांगत सुटतात. हे काय डॉक्टर आहेत काय? अशी टीकासुद्धा त्यांनी शिवसेनेवर केली. ५६ जागांवर मुख्यमंत्री होता येतं आणि १०५ जागा घेणाऱ्यांना टाटा, बाय बाय करता, हा विश्वासघात नाही काय? असा सवालसुद्धा चंद्रकांत पाटलांनी उपस्थित केला.

दरम्यान, आता महाविकास आघाडीला सत्तेत येऊन दोन वर्षांचा कालावधीत पूर्ण होत आलाय. त्यांनंतरही युतीच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जातात. त्यामुळे भाजप शिवसेनेतील संबंध अधिकच ताणले जात आहेत. सेना आणि भाजप सध्या तरी एकत्र येतील, असे दिसत नाही.

loading image
go to top