sangita khandekar and prashant danav
sakal
चंद्रपूर - चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आज मंगळवारी ‘हाय-व्होल्टेज’ राजकीय नाट्य पाहायला मिळाले. शिवसेना (यूबीटी) पक्षाने ऐनवेळी भाजपशी हातमिळवणी केल्याने काँग्रेसच्या हातातील महापौरपद निसटले.
भाजपच्या संगीता खांडेकर यांनी काँग्रेसच्या वैशाली महाडोळे यांचा अवघ्या एका मताने पराभव केला. तर, उपमहापौरपदी ठाकरेंच्या पक्षाचे प्रशांत दानव ईश्वरचिठ्ठीने विजयी झाले.