Wardha | भाजपवासी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची घुसमट; राहुल गांधींची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपवासी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची घुसमट; राहुल गांधींची टीका

भाजपवासी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची घुसमट; राहुल गांधींची टीका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वर्धा : काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या कार्यकर्त्यांची घुसमट, जगणं कठीण होत आहे. भाजपचे आयकॉन सावरकर तर काँग्रेसचे आयकॉन महात्मा गांधीजी आहेत. काँग्रेसची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्याची गरज आहे, असे विचार काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केले.

वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रम परिसरातील यात्री निवास येथे काँग्रेसचे चार दिवसीय राष्ट्रीय संघटन प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराच उदघाटन राहुल गांधी यांच्या हस्ते ऑनलइन पद्धतीने पार पडले. शिबिरात देशभरातून काँग्रेसचे २०० पदाधिकारी सहभागी झाले आहे. यावेळी राहुल गांधी यांनी उपस्थित पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. या शिबिराच्या उदघाटन सत्राला पालकमंत्री सुनील केदार यांनी उपस्थित राहत मार्गदर्शन केले तर दुपारच्या सत्राला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान उपस्थित होते.

देशात दोन विचारधारा आहे. एक काँग्रेसची आणि एक आरएसएसची. भाजप आणि आरएसएसच्या विचारधारेने देशात द्वेष पसरवत आहे. देशात काँग्रेसच्या विचारधारेवर आता भाजपची विचारधारा ओव्हरशाडो झाली आहे. भाजपचा प्रपोगंडा जास्त आहे. आता विचारधारेची लढाई आवश्यक झाली आहे. काँग्रेसची विचारधारा ही जुनी विचारधारा आहे. भाजप हिंदुत्वची गोष्ट करत आहे.

हेही वाचा: अमरावती : बंदसाठी दगडफेक; त्रिपुरा घटनेचा निषेध

भाजपचे आयकॉन सावरकर आहे तर काँग्रेसचे आयकॉन महात्मा गांधी आहे. काँग्रेसच्या विचारधारेला पाहिले काँग्रेस कार्यकर्ता समजून नागरिकांपर्यंत पोहोचवत होते. मात्र आता ते विसरले आहे. आता काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहवायची पुन्हा गरज निर्माण झाली आहे. काँग्रेसची विचारधारा संपूर्ण देशात पोहचवुन सामान्य जनतेला पोहचवण्याचे काम करायचे आहे.

विविध चर्चेत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उत्तर गरजेचे

काँग्रेसचा कोणताही कार्यकर्ता, नेता असो त्यांना प्रशिक्षण बंधनकारक होणे गरजेचे आहे. ३७०, आतंकवाद, राष्ट्रीयतावर जेव्हा चर्चा होते तेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. आजकाल काँग्रेसचे लोक भाजप आणि आरएसएसमध्ये जातात. अनेक जण परतही येतात. उत्तराखंडचे आर्यजी परत आले त्यांना विचारले परत का आले, ते म्हणतात तेथे राहता येत नाही, तेथे घुसमट होते ते समाजाला बदलवत नाही, ते आमचा उपयोग करून घेतात, असेही ते म्हणाले.

loading image
go to top