भाजपचा नगराध्यक्षाचा उमेदवार उद्या ठरणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

गोंडपिपरी जि.चंद्रपूर : सत्तावीस तारखेला नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठीची रणधुमाळी अंतीम टप्यात आली आहे. पुरेसे बहुमत जुळवीत काँग्रेस, सेना, अपक्ष उमेदवार एकत्र आले. दुसरीकडे सत्तधारी भाजपला सत्ता कायम ठेवण्यासाठी एका नगरसेवकाची गरज आहे.

त्याला आपल्या खेम्यात वळविण्यासाठी भाजपकडून जिवाचे रान केले जात आहे. पण अपेक्षित यश मिळत नसल्याने त्यांचे गणीत बिघडण्याची भिती आहे. दरम्यान अध्यक्षपदाकरिता उद्या 23 जुलैला अर्ज दाखल करायचे आहेत. त्यामुळे भाजपकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असणार हे उद्याच स्पष्ट होईल.

गोंडपिपरीच्या नगराध्यक्षाची निवडणूक येत्या 27 तारखेला होऊ घातली आहे. 
राजूरा विधानसभा क्षेत्रात केवळ गोंडपिपरी नगरपंचायतीवर सत्तेने भाजपची लाज राखली. पण आता मात्र गोंडपिपरी नगरपंचायतीवरील भाजपची सत्ता जाण्याची स्थीती आहे. सतरा सदस्यीय नगरपंचायतीत सात अपक्ष. सहा भाजप, तीन काँग्रेस व एक सेना असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेस व सेनेने पाच आपक्षांना आपल्या कडे खेचले व बहुमताचे गणीत पक्के केले. याउलट भाजपकडे सहा व दोन अपक्ष अशी आठ मते आहेत पण बहुमतासाठी एका नगरसेवकाची गरज आहे.

या एका मतासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांची आटापिटा सूरू आहे. यातच अध्यक्ष कोण असेल हे पक्षाने स्फष्ट केले नाही. त्यामुळे पक्षाअंतर्गत गोंधळाची स्थीती आहे. भाजपचे नगरपंचायतीचे गटनेते चेतनसिंह गौर व नगरसेवक राकेश पून हे आध्यक्षपदाचे दावेदार मानले जात आहेत. आज 23 नगराध्यक्षाकरिता अर्ज भारण्याचा दिवस आहे. यावेळेसच अध्यक्षाचा उमेदवार निश्चीत होणार आहे. काँग्रेसकडून कंत्राटदार रवी साखलवार यांची भावसून सपना साखलवार अध्यषपदाच्या उमेदवार मानल्या जात आहे. आडीच वर्षाच्या काळात भाजपला त्यांनी पाठिंबा दिला होता. सध्यातरी बहुमताचा, आकडा काँग्रेस सेना युतीकडे आहे. आपले नगरसेवक फूटू नये यासाठी त्यांनी जबारजस्त सेटिंग लावले आहे.

रवी साखलवार, शिवसेनेचे तालूकाध्यक्ष सुनील संकुलवार यांनी माजी आमदार सुभाष धोटे यांच्याशी समन्वय साधून सत्ता बसविण्यासाठी बाहुमताव्दारे एक पाऊल पुढे टाकले आहे.

लाभार्थ्यांनाही नगरसेवकाची वाट

सध्या नगरात प्रधानमंत्री आवास योजना राबाविली जात आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी विविध कागदपत्रांसह नगरसेवकांच्या दाखल्याची गरज आहे. योजनेच्या लाभाची अंतीम तारीख 25 जुलै सांगितली जात आहे. अशात बहूतांश नगरसेवक बाहेर असल्याने नगरवासीयांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. दर्शनातून नगरसेवक मजा लूटत असतांना योजनेच्या लाभार्थ्यानाही नगरसेवकाची वाट लागली आहे.

Web Title: BJP decide mayor candidate for tomorrow