यवतमाळमध्ये भाजपला खिंडार; माजी आमदार राजू तोडसम राष्ट्रवादीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raju todsam

यवतमाळमध्ये भाजपला खिंडार; माजी आमदार राजू तोडसम राष्ट्रवादीत

यवतमाळ: आर्णी विधानसभेचे भाजपचे माजी आमदार प्रा. राजु तोडसाम यांनी गुरुवार (ता.11) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुबंई येथे झालेल्या कार्यक्रमात प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीपुर्वी भाजप मध्ये जाणर्‍यांची संख्या जास्त होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार्‍यांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमींग सुरु झाली आहे. बाबासाहेब गाडे पाटील यांच्या नंतर आता आर्णी विधानसभेचे भाजपचे माजी आमदार राजु तोडसाम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे. 2019 मध्ये भाजपने तोडसाम यांना उमेदवारी नाकारली होती.

राजु तोडसाम यांनी बंड करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करीत निवडणुक लढविली होती. त्यामुळे त्यांना पक्षातून निष्काषीत करण्यात आले होते. आगामी काही दिवसात जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आहे. त्या पार्श्‍वभुमीवर तोडसाम यांचा झालेला पक्ष प्रवेक्ष महत्वाचा मानला जात आहे. आर्णी, पांढरकवडा तसेच घाटंजी या दोन तालुक्यात तोडसाम यांचा चांगला प्रभाव आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: ‘या’ गावात केला जातो जावयांचा सार्वजनिक सत्कार; वाचा सविस्तर

दरम्यान, तोडसाम यांच्या पक्षपवेक्षावेळी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आमदार इंद्रनील नाईक, माजी आमदार संदीप बाजोरीया, जिल्हाध्यक्ष क्रांती पाटील कामारकर आदी उपस्थित होते.

loading image
go to top