आता भाजपच्या निवड मंडळाची परीक्षा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

नागपूर - भाजपच्या वतीने महापालिकेच्या 38 प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तब्बल तीन हजार दोन उमेदवारांना पक्षाकडे दावेदारी केली आहे. यामुळे उमेदवारी वाटपाचा गुंता सोडविण्यासाठी भाजपच्या निवड मंडळाची परीक्षा सुरू झाली आहे. 

नागपूर - भाजपच्या वतीने महापालिकेच्या 38 प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तब्बल तीन हजार दोन उमेदवारांना पक्षाकडे दावेदारी केली आहे. यामुळे उमेदवारी वाटपाचा गुंता सोडविण्यासाठी भाजपच्या निवड मंडळाची परीक्षा सुरू झाली आहे. 

आठ दिवस प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील प्रभागनिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. शुक्रवारी शेवटच्या दिवशी 32, 33 व 34 या तीन प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. बारा जागांसाठी 268 उमेदवारांनी दावा केला. यात प्रामुख्याने संदीप गवई, रमेश सिंगारे, डॉ. अरविंद तल्हा, अजय ढोक, अमित तिडके, मंगला मस्के, राखी कोहळे, नेहा लघाटे, श्रीकांत पांडे, अशोक उरकुडे, प्रणाली गाडगे, योगेश गोन्नाडे, विनिता पांडे, शेषराव आष्टणकर, पीयूष भोयर, दीपक चौधरी, कल्पना कुंभलकर, पूजा तिवारी, वत्सला मेश्राम यांचा समावेश आहे. 

शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, खासदार डॉ. विकास महात्मे, निवडणूक समन्वयक आमदार अनिल सोले, आमदार सुधाकर देशमुख, आमदार गिरीश व्यास, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मिलिंद माने, महापौर प्रवीण दटके, प्रदेश सचिव माया इवनाते, प्रदेश अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दिकी, महामंत्री संदीप जोशी, संघटनमंत्री भोजराज डुंबे, महिला मोर्चा शहराध्यक्ष नंदा जिचकार तथा अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्या निवड मंडळाच्या वतीने मुलाखती घेण्यात आल्या. 

फक्‍त 71 इच्छुकांना उमेदवारी वाटप 
सुमारे 80 उमेदवार भाजपचे विद्यमान नगरसेवक आहेत. यामुळे फक्त 71 इच्छुकांना उमेदवारी वाटप करायची आहे. उरलेल्या दोन हजार नऊशे इच्छुकांना नकार कसा द्यायचा, त्यांची नाराजी दूर करून समजूत कशी काढायची असा प्रश्‍न निवड मंडळाला भेडसावत आहे. सोबतच उमेदवारी नाकारलेले उमेदवार बंडखोरी तसेच पक्षविरोधी कारवाया करणार नाही याचीही काळजी घ्यावी लागणार आहे.

Web Title: BJP interviews on behalf of the 38 municipal ward of aspirants