गडचिरोली, भंडारा जिल्ह्यात भाजप आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

गडचिरोली नगर परिषदेत भाजपला 25 पैकी 20 जागा मिळाल्या. कॉंग्रेसला 1 जागा , अपक्षला 3 जागा, रासपला 1 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला खाता उघडता आले नाही.

नागपूर - विदर्भातील भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांतील सहा नगर परिषदांचे निकाल सुरू असून भाजप आघाडीवर आहे. सोमवारी (ता. 19) जाहीर झालेल्या निकालनुसार गडचिरोली नगर परिषद भाजपने जिंकली. नगरध्यक्षपदी भाजपच्या योगिता पिपरे निवडून आल्या.

गडचिरोली नगर परिषदेत भाजपला 25 पैकी 20 जागा मिळाल्या. कॉंग्रेसला 1 जागा , अपक्षला 3 जागा, रासपला 1 जागा मिळाल्या. राष्ट्रवादी आणि शिवसेनेला खाता उघडता आले नाही.

देसाईगंजात नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या शालू दंडवते आघाडीवर आहेत. कॉंग्रेसच्या अर्चना डांगे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. देसाईगंज नगर परिषद निवडणुकीत भाजपला एकूण 17 जागांपैकी 11 जागा मिळाल्या. कॉंग्रेसला 2 जागा मिळाल्या. राषश्‍ट्रवादी कॉंग्रेसला 1 जागा मिळाली. 14 जागांचे निकाल जाहीरझाले. 3 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे.

भंडारा जिल्ह्यातील चार नगर परिषदांचे निकाल असे. तुमसरात भाजपचे प्रमोद पडोळे नगराध्यक्षपदी विजयी झाले. येथे 23 जागापैकी भाजपला 15 जागा मिळाल्या, राष्ट्रवादी कॉंग्रेसला 2, कॉंग्रेसला 3, अपक्ष 1, साकोलीत भाजपचे धनवंतरा राऊत नगराध्यक्षपदी विजयी झाले. 17 जागांपैकी भाजपला 11 जागा मिळाल्या, राष्ट्रवादी कॉंग्रेसला 1, कॉंग्रेसला 1, अपक्षांना 4 जागा मिळाल्या.

पवनीत नगरविकास आघाडीच्या पूनम काटेखाये नगराध्यक्षपदासाठी आघाडीवर असून भंडाऱ्यात भाजपचे नगराध्यक्ष सुनील मेंढे आघाडीवर आहेत. इतर ठिकाणचे निकाल हाती यायचे आहेत.

Web Title: bjp lead position in gadchiroli, bhandara district