भाजपचे सहाही मतदारसंघात सदस्य अभियान

file photo
file photo

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता अभियानाला उद्यापासून सुरुवात होत आहे. सहाही मतदारसंघात सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या केंद्रीय भाजप कार्यालयाला मिस्ड कॉल करून सदस्यत्वाची नोंदणी करणार आहेत.
भाजपने राज्यातील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असून, मोठ्या विजयासाठी आत्मविश्‍वास वाढला आहे. त्यासाठी सदस्यता अभियानाला सुरुवात करण्यात येईल. पूर्व मंडळात वाठोडा येथील गंगा सेलिब्रेशन हॉलमध्ये दुपारी दोन वाजता आयोजित सदस्य नोंदणी अभियानाच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे केंद्रीय कार्यालयाला मिस्ड कॉल करीत नोंदणी करतील. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, मंडळ अध्यक्ष महेंद्र राऊत, प्रदीप पोहाणे, प्रमोद पेंडके उपस्थित राहतील. मध्य मंडळाचा कार्यक्रम अटल आरोग्य शिबिराच्या बिंझाणी महाविद्यालयाजवळील कार्यालयात होईल. यावेळी आमदार विकास कुंभारे, शहर भाजपाध्यक्ष प्रवीण दटके, मंडळ अध्यक्ष बंडू राऊत, किशोर पलांदूरकर, दयाशंकर तिवारी उपस्थित राहतील. दक्षिण-पश्‍चिम मंडळाचा कार्यक्रम खामला येथील पराते हॉलमध्ये होईल. यावेळी आमदार प्रा. अनिल सोले, सत्तापक्षनेता संदीप जोशी, मंडळ अध्यक्ष रमेश भंडारी, राजू हडप, महापौर नंदा जिचकार उपस्थित राहतील. दक्षिण मंडळाचा कार्यक्रम क्रीडा चौकातील संत रविदास सभागृहात होणार असून, यावेळी आमदार सुधाकर कोहळे, संदीप जोशी, मंडळ अध्यक्ष संजय ठाकरे, बळवंत जिचकार उपस्थित राहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com