भाजप राजकीय दहशतवादी पक्ष

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष जातीय व धार्मिक दंगली घडवून देशात अस्थिरता निर्माण करीत आहे. दंगलीच्या सूत्रधारांना क्‍लीन चिट देणाऱ्या नेत्यांची चौकशी करावी. भाजप म्हणजे राजकीय दहशतवादी पक्ष असल्याचा आरोप काँग्रेसचे सामाजिक न्याय व अनुसूचित जाती-जमातीचे अध्यक्ष डॉ. राजीव वाघमारे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

भाजपच्या कार्यकाळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. कृषी विभागाने ६२ हजार २६३ कोटी कर्जमाफीचे उद्दिष्ट ठेवले असताना, केवळ १० टक्केच कर्जमाफी झाली आहे. यवतमाळात २ हजार ७८ कोटींपैकी केवळ ३७७ कोटी कर्ज वाटप केले. एसबीआयमार्फत ५७१ कोटी मिळणार होते. मात्र, केवळ ५१ कोटींचे वाटप केले आहे. पीककर्जाची हमी देऊन नियोजनबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांना संपविण्याचे काम भाजप सरकार करीत आहे, असेही डॉ. वाघमारे म्हणाले. लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार पुरस्कृत दंगली घडण्याची शक्‍यता असल्याचाही आरोप वाघमारे यांनी केला. अतुल लोंढे, संदीप सहारे, रमन पैगवार, अनिल नगरारे व दादाराव डोंगरे उपस्थित होते.

लोकांवर होतोय अन्याय
मूलभूत प्रश्‍नांना बगल देऊन केवळ दिखाऊ विकासाकडे भाजप सरकार लक्ष केंद्रीत करीत आहे. कोरेगाव भीमा दंगलीतील दोषी मनोहर भिडे यांची चौकशी कोणत्या पोलिस शाखेने केली तेही अद्याप मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले नाही. तसेच जळगाव जिल्ह्यातील वाकडी येथे झालेल्या प्रकरणावरही मंत्री गिरीश महाजन पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकारातून भाजप सरकार अनुसूचित जाती धर्माच्या लोकांवर अन्याय करीत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे डॉ. वाघमारे म्हणाले.

Web Title: BJP party in Political pressure rajeev waghmare