पालकमंत्र्यांच्या सभेत भाजप कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न 

पालकमंत्र्यांच्या सभेत भाजप कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न 

भंडारा : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सभेत भाजप कार्यकत्याचा आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना आज भंडारा येथिल भगतसिंग वार्डात घडली.

भगतसिंग वार्डातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवरील अतिक्रमण होत आहे. सदर अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी भाजप पदाधिकारी अरुण भेदे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. परंतु, अतिक्रमण हटविण्यात आले नाही. यामुळे त्यांनी पालकमंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीतील सभेत मंचावर जावून त्यांनी अंगावर केरोसिन जाळून घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांनी त्याला अडविले. यानंतर पोलिसांनी मंचावरून खाली उतरून समजूत घातली आणि भाजप कार्यकर्त्याला आत्मदहन करण्यापासून रोखले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com