भाजपमुळे जातीय सलोख्याला तडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

तेढ निर्माण करण्याचे काम
भाजप शासनाच्या नाकर्तेपणामुळे नुकत्याच झालेल्या भारत बंद आंदोलनात अनेकांचा नाहक  बळी गेला. विविध राज्यांत जाणीवपूर्वक सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याचा घणाघात माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी केला.

नागपूर - केंद्र व राज्य सरकारचे चुकीचे निर्णय आणि द्वेषपूर्ण राजकारणामुळे देशातील शांतता भंग झाली असून, जातीय सलोख्याला तडे गेल्याचा आरोप करीत शहर व जिल्हा  काँग्रेसने संविधान चौकात सोमवारी उपोषण केले. काँग्रेस नेत्यांनी भाजपवर तोंडसुख घेतले.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशात वाढता हिंसाचार, जातीय दंगलीस जबाबदार भाजप सरकारविरोधात एक दिवसाचे उपोषण करण्याची सूचना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले होते. शहर व जिल्हा काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्त्वात संविधान चौकात नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात उपोषण केले. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, आमदार सुनील केदार, डॉ. बबनराव तायवाडे, बंटी शेळके, माजी शहर काँग्रेसाध्यक्ष शेख हुसेन, माजी नगरसेवक प्रशांत धवड, नगरसेवक संजय महाकाळकर, संदीप सहारे, नगरसेविका दर्शनी धवड, हर्षला साबळे, अतुल लोंढे, उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, नरेश गावंडे, राजेश कुंभलकर, हरिभाऊ नाईक, उमेश शाहू, अक्षय समर्थ, तक्षशीला वाघधरे, प्रज्ञा बडवाईक, सुनीता गावंडे आदी उपस्थित होते.

उपोषणाच्या माध्यमातून देशातील जनतेला सामाजिक ऐक्‍य व जातीय सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन काँग्रेसच्या नेत्यांनी केले. अतुल कोटेचा, अनंत घारड, मुजीब पठाण, हर्षवर्धन निकोसे, राजू व्यास, बंडोपंत टेंभूर्णे, जयंत लुटे, रमण पैगवार, अण्णाजी राऊत, शिल्पा बोडखे, शांता कुमरे, कुंदा राऊत, ज्योती झोड, आशा राऊत, कुंदा आमधरे, सरिता रंगारी, गिरीजा आवळे, श्‍यामला वाघधरे, योगिता इटनकर, मनीषा लोहकरे, आरती बाळसराफ, सुषमा सायने, शालिनी मनोहर, चंदा येळणे, सुरय्या बानो, विद्या सेलोकर, अवंतिका लेकुरवाळे, उमेश शाहू, चंद्रकांत बडगे, रमेश पुणेकर, देवा उसरे, आशा धुर्वे, संजय सरायकर, रमण ठवकर, अनिल पांडे, अनिल रॉय, बाबा शेळके अजय नासरे आदी उपस्थित होते.

Web Title: BJP politics