#NagpurWinterSession : भाजप-सेनेच्या आमदारांत धक्काबुक्की, दोनवेळा कामकाज तहकुब 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

नागपूर : विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये मदत देण्यासाठी चर्चा करण्याची मागणी केली. यावेळी भाजप आमदारांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली. तसेच अभिमन्यू पवार आणि नारायण कुचे यांनी बॅनर झळकावले व घोषणाबाजी केली. यावेळी शिवसेनेचे संजय रायमूलकर यांनी बॅनर ओढण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही पक्षाच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली. भाजपचे आशीष शेलार, गिरीश महाजन आणि शिवसेनेचे भास्कर जाधव, संजय राठोड यांनी मध्यस्ती केली. 

ठळक बातमी -  #NagpurWinterSession :  दिलेले आश्‍वासन पूर्ण करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. तसे वृत्तही सामनामध्ये प्रकाशित झाले होते. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्‍वासन पूर्ण करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. विरोधी पक्षाचे आमदार परिसरात सामनामध्ये प्रकाशित वृत्त "मी तुम्हाला न्याय देण्यासाठी बांध्यावर आलोय' असे बॅनर घेऊन आंदोलन केले. या सरकारला शेतकऱ्यांची चिंता आहे. त्यामुळेच त्यांनी हेक्‍टरी 25 हजार देण्याचे आश्‍वासन दिले होते. आता त्यांचेच सरकार आहे. हीच ती वेळ आहे असे म्हणून दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याची मागणी केली. एकंदरीत शेतकरी मुद्‌द्‌यावरून सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. 

हेही वाचा -  #NagpurWinterSession : रणनिती ठरविण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक

कामकाज तहकुब

शेतकरी मुद्‌द्‌यावरून विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभेत सरकारला जाब विचारण्याला सुरुवात केली. यामुळे सभेज चांगलाच गदारोळ सुरू होता तसेच हाणामारीही झाली. यावेळी विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. अध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधकांना शांत राहण्याची विनंती केली. मात्र, विरोधक काहीही ऐकण्याच्या स्थितीत नसल्यामुळे त्यांनी सभेचे कामकाज अर्धा तासासाठी नंतर दहा मिनिटांसाठी तहकुब केले. 

भाजप मारामारीपर्यंत पोहोचली
भाजपची अपरिपक्वता आज त्यांच्या वागण्यावरून दिसून आली. भाजप मागील पाच वर्षांचे अपयश धुऊन काढण्यासाठी सत्तेवर येऊन दोन दिवस झालेल्या सरकारला हिशोब विचारत आहे. आणि दोन दिवसांसाठी भाजप मारामारीपर्यंत पोहोचली आहे. केंद्रातील सत्ता तेच करीत आहे आणि अन्य राज्यतही सत्ता तेच करीत आहे. भाजप सत्तेशिवाय राहू शकत नाही. 
- जितेंद्र आव्हाड, 
आमदार, राष्ट्रवादी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP-Sena MLA attacked each other