#NagpurWinterSession : रणनिती ठरविण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 17 December 2019

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्‍तव्यानंतर भाजप आमदारांनी सभागृहात बॅनर झळकवित राहुल गांधी मुर्दाबाद अशा घोषणा देत गोंधळ घातला. सावरकरांबद्दल बोलू देत नसलेले सरकार हे इंग्रजांचे सरकार आहे काय, असा सवालही विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता.

नागपूर : हिवाळी अधिवेशनाची रणनिती ठरविण्यासाठी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. यावेळी तिन्ही पक्षांचे मोठे नेते उपस्थित होते. वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेऊन किमान समान कार्यक्रमावर भर द्याव व सरकार पाच वर्षे चालावे यासाठी बैठक आयोजिण्यात आली आहे. बैठकीला उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, बाळासाहेब थोरात, संजय राऊत आदी उपस्थित आहे. 

सविस्तर वाचा -  ही ब्रिटिशांची विधानसभा आहे का? : देवेंद्र फडणवीस

हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस चांगलाच गाजला. यामुळे कामकाजही थांबवावे लागले होते. अपेक्षेप्रमाणे विरोधकांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्‌द्‌यावरून सरकारला कोंडीत पकडण्याची तयार केली होती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अपमानामुळे देशात संतापाची लाट उसळली आहे. सर्वच जण राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करीत आहेत. भाजपच्या आमदारांनी सावरकरांच्या मुद्‌द्‌यावरून विधानभावन परिसरात आंदोलन केले. "मी सावरकर' अशी टोपी घालून आमदार परिसरात दाखल झाले होते. "सावरकरांचा अपमान खपवून घेणार नाही', "राहुल गांधी यांनी माफी मागावी' अशा घोषणा भाजपच्या आमदारांनी विधानभवन परिसरात दिल्या. 

ठळक बातमी -  सावरकरांच्या मुद्यावरून सभागृहात झळकले बॅनर

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्‍तव्यानंतर भाजप आमदारांनी सभागृहात बॅनर झळकवित राहुल गांधी मुर्दाबाद अशा घोषणा देत गोंधळ घातला. सावरकरांबद्दल बोलू देत नसलेले सरकार हे इंग्रजांचे सरकार आहे काय, असा सवालही विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला होता. याच मुद्द्यावरून सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूबही करावे लागले होते. झारखंडमधील सभेतील "रेप इन इंडिया' या विधानाबद्दल राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपसह तमाम सावरकरप्रेमींकडून होत आहे. मात्र, "माफी मागायला माझे नाव काही राहुल सावरकर नाही', असं म्हणत राहुल गांधींनी नव्या वादाला तोंड फोडले. देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मांडत कॉंग्रेस नेत्याने त्यांचा अपमान केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. परंतु, हे बोलणे रेकॉर्डवर न घेण्याचे निर्देश विधानसभाध्यक्षांनी दिले. त्यामुळे चिडलेल्या विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. 

सरकार किमान समान कार्यक्रमाधारी 
हे सरकार किमान समान कार्यक्रमाधारी आहे. आमदार स्वत:ला पक्षापेक्षा महाविकास आघाडीचे आमदार समजतात. हे सरकार पाच नव्हे तर अनेक वर्षे चालेल. देशाच्या भल्यासाठी वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवावे. 
- एकनाथ शिंदे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting of Government