esakal | राज्यकर्त्यांना पीडितेच्या आई-वडिलांचे अश्रू कळले नाही; भाजप प्रवक्ता चित्रा वाघ यांचा आरोप
sakal

बोलून बातमी शोधा

BJP spokesperson Chitra Wagh accused the state government political news

शब्द फक्त घरच्यांचेच पाळायचे नसतात तर लोकांनाही न्याय द्यायचा असतो, याचा विसर राज्यकर्त्यांना पडलेला आहे. अंकिताच्या जळीत कांडानंतर राज्यात स्त्री अत्याचाराच्या अनेक गंभीर स्वरूपाच्या घटना राज्यात घडल्या आहे. राज्यकर्ते निद्रावस्थेत आहेत, असेही वाघ म्हणाल्या.

राज्यकर्त्यांना पीडितेच्या आई-वडिलांचे अश्रू कळले नाही; भाजप प्रवक्ता चित्रा वाघ यांचा आरोप

sakal_logo
By
रूपेश खैरी

हिंगणघाट (जि. वर्धा) : राज्यात स्त्री अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. महिलांना रस्त्यावर फिरणे कठीण झाले आहे. स्त्री अत्याचाराबाबत राज्यकर्ते असंवेदनशील दिसून येतात. राज्यात शिवशाही आहे की मोगलाई, असा सवाल करीत भाजपच्या प्रवक्ता चित्रा वाघ यांनी पत्रकारपरिषदेत राज्यातील शासनकर्त्यांचा खरपूस समाचार घेतला.

प्रा. अंकिता पिसुड्डे हिच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्या येथे आल्या होत्या. त्यांनी पीडितेच्या घरी भेट दिली. यानंतर आमदार समीर कुणावार यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार समीर कुणावार, नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, भाजप महामंत्री किशोर दिघे, आकाश पोहाने, संजय डेहणे, गजानन राऊत, मनीष देवढे, आशीष पर्बत, सुनील डोगरे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा - टिनाच्या शेडात पाच मुली, माय आणि आजी, चार महिन्यांपासून नाही अंघोळ

प्रा. अंकिता पिसुड्डे हिच्या मृत्यूला एक वर्ष लोटूनही राज्यातील शासनकर्त्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही. प्राध्यापिका युवतीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळले. या घटनेने राज्य हादरून गेले. विविध स्तरावरून संतापाची लाट उसळली. एरवी घसा कोरडा होईपर्यंत बोलणारे नेते आज गप्प का, त्यांना पीडितेच्या आई-वडिलांचे अश्रू कळलेले नाही, असेही वाघ म्हणाल्या.

शब्द फक्त घरच्यांचेच पाळायचे नसतात तर लोकांनाही न्याय द्यायचा असतो, याचा विसर राज्यकर्त्यांना पडलेला आहे. अंकिताच्या जळीत कांडानंतर राज्यात स्त्री अत्याचाराच्या अनेक गंभीर स्वरूपाच्या घटना राज्यात घडल्या आहे. राज्यकर्ते निद्रावस्थेत आहेत, असेही वाघ म्हणाल्या.

जाणून घ्या - अमरावतीत कोरोना रुग्णांचा विस्फोट; प्रशासनाच्या पायाखालची सरकली जमीन

दिशा कायदा फक्‍त कागदावरच

राज्यात दिशा कायदा करण्याची घोषणा शासनाने केली आहे. परंतु, यालाही विलंब होत आहे. स्त्री अत्याचाराबाबत पोलिस प्रशासन सुद्धा गंभीर नाही, असे दिसून येत आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्रीसह शासनातील लोकांनी प्रा. अंकिता प्रकरणात असंवेदनशीलता दाखविली आहे. त्यांनी वर्षभरात साधी या प्रकरणाची दखलही घेतली नसल्याचा आरोप भाजप प्रवक्ता चित्रा वाघ यांनी केला.

loading image
go to top