भाजप महिला आघाडी मुख्यमंत्र्यांना पाठविणार 25 हजार राखी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

यवतमाळ : महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांचा महिलांना होत असलेल्या लाभाची जाण ठेवून राज्यासह जिल्हाभरातील महिलांनी मुख्यमंत्र्यांना राखी पाठवून एक बंधुत्त्वाचे नाते जपण्याचे ठरविले आहे. त्यानुसार भाजप महिला आघाडीतर्फे जिल्हाभरात 1 ते 15 ऑगस्ट रक्षासूत्र अभियान राबविण्यात येत आहे.

शासनातर्फे माझी कन्या भाग्यश्री योजना, पंतप्रधान समृद्घी योजना, महिला स्वावलंबन, महिला आरोग्य, विवाह योजना, अस्मिता योजना महिलांसाठी राबविण्यात येत आहेत. राज्यात महिलांना विशेष स्थैर्य व सुरक्षा लाभली आहे. अनेक महिला बचतगटांना सरकारची मदत मिळाली आहे. मुलींना दहावीनंतर हवे ते शिक्षण घेण्यासाठी विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना महिला आघाडीच्या वतीने रक्षासूत्र हा पवित्र धागा पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 16 ऑगस्टला मुंबई येथे होणाऱ्या महिला मेळाव्यात जिल्हाभरातून 25 हजार रक्षासूत्र पाठविण्यात येणार आहे. या माध्यमातून 25 हजार राखी गोळा करून 52 महिला पदाधिकारी मुंबईला घेऊन जाणार आहेत. याशिवाय ज्या महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे, अशा प्रत्येक मंडळातील एक अशा 21 महिला लाभार्थीसुद्घा महिला मेळाव्यासाठी जाणार आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP women alliance to send 25 thousand Rakhi to the chief minister