मुनगंटीवारांनी राखला चंद्रपूर जि. प.चा गड, भाजपच्या रेखा कारेकार विजयी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 January 2020

अनेकांनी मोर्चेबांधणी केली होती. मागील आठवड्यातच हैदराबाद येथे गेलेले भाजपचे सदस्य शनिवारी (ता. 4) पहाटे चंद्रपुरात पोहोचले. चंद्रपूरहून थेट या सदस्यांची बस मोहुर्लीत पोहोचली. सकाळी नऊ ते दहा वाजताच्या सुमारास माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री अहीर, आमदार भांगडिया यांच्या उपस्थितीत तेथे बैठक पार पडली. भाजप सदस्यांत असलेल्या नाराजीच्या पार्श्‍वभूमीवर मुनगंटीवार यांनी अध्यक्षपदाचे नाव जाहीर केले नाही.

चंद्रपूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी शनिवारी (ता. 4) निवडणूक पार पडली. अध्यक्षपदी भाजपच्या संध्या गुरनुले तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपच्याच रेखा कारेकार विजयी झाल्या आहेत. जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व कायम राखले आहे.

मूल तालुक्‍यातील राजोली-मारोडा जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्य असलेल्या संध्या गुरनुले यांनी यापूर्वीही जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले आहे. जिल्हा परिषदेतील त्या ज्येष्ठ सदस्या आहेत. उपाध्यक्षपदी निवडून आलेल्या रेखा दिलीप कारेकार या चिमूर तालुक्‍यातील खडसंगी-मुरपार क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्य आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण महिला (खुला) साठी राखीव होते. त्यामुळे भाजपच्या महिला सदस्यांत प्रचंड स्पर्धा होती.

हेही वाचा - खरं आहे डोळे मिटेपर्यंत प्रेम करते ती आईच असते...यातही आघाडी
 

अनेकांनी मोर्चेबांधणी केली होती. मागील आठवड्यातच हैदराबाद येथे गेलेले भाजपचे सदस्य शनिवारी (ता. 4) पहाटे चंद्रपुरात पोहोचले. चंद्रपूरहून थेट या सदस्यांची बस मोहुर्लीत पोहोचली. सकाळी नऊ ते दहा वाजताच्या सुमारास माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री अहीर, आमदार भांगडिया यांच्या उपस्थितीत तेथे बैठक पार पडली. भाजप सदस्यांत असलेल्या नाराजीच्या पार्श्‍वभूमीवर मुनगंटीवार यांनी अध्यक्षपदाचे नाव जाहीर केले नाही. एक वाजताच्या सुमारास भाजप सदस्यांचे वाहन जिल्हा परिषदेच्या परिसरात आले.

त्याचवेळी अध्यक्षपदाचे नाव जाहीर समोर करण्यात आले. गटनेते देवराव भोंगळे यांनी संध्याताई गुरनुले यांना सोबत अध्यक्षपदासाठी नामनिदर्शनपत्र सादर केले. उपाध्यक्षपदासाठी रेखा कुरेकार यांचेही नामांकन दाखल केले. कॉंग्रेसकडून अध्यक्षपदासाठी वैशाली शेरकी, उपाध्यक्षपदासाठी खोजराज मरस्कोल्हे यांचे नामांकन दाखल करण्यात आल्यानंतर मतदान झाले. भाजपच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार संध्याताई गुरनुले यांना 36 मते, तर कॉंग्रेसच्या वैशाली शेरकी यांना 20 मते मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bjp won chandrapur z p election in sudhir mungantiwar leadership