गोंदिया नगर परिषदेत कमळ फुलले 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

गोंदिया - राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, बसप या प्रमुख पक्षांना मागे रेटत गोंदिया व तिरोडा नगर परिषदेवर भाजपने आपले नगराध्यक्ष बसविले. गोंदियात अशोक इंगळे हे 5 हजार 949, तर तिरोड्यामध्ये सोनाली देशपांडे 95 मतांनी विजयी झाल्या. 

गोंदिया - राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, बसप या प्रमुख पक्षांना मागे रेटत गोंदिया व तिरोडा नगर परिषदेवर भाजपने आपले नगराध्यक्ष बसविले. गोंदियात अशोक इंगळे हे 5 हजार 949, तर तिरोड्यामध्ये सोनाली देशपांडे 95 मतांनी विजयी झाल्या. 

गोंदियात भाजपचे 18, कॉंग्रेस नऊ, राष्ट्रवादी कॉंगेस सात, बसप पाच आणि शिवसेनेने दोन जागा मिळविल्या. एक अपक्ष उमेदवार निवडून आला. तिरोडा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसला नऊ, भाजप पाच आणि शिवसेनेने दोन जागा मिळविल्या. येथेदेखील एका अपक्ष उमेदवाराचा विजय झाला. गोंदियात नगराध्यक्षपदाकरिता 14 तसेच 21 प्रभागांतील नगरसेवकांच्या 42 जागांसाठी 257 उमेदवार आणि तिरोड्याच्या नगराध्यक्षपदाकरिता आठ आणि नगरसेवकांच्या 17 जागांकरिता 76 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 

गोंदियात भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, बसप या प्रमुख पक्षांसह अन्य पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनीही निवडणूक लढविली. रविवारी (ता. 8) मतदान झाले. सोमवारी (ता. 9) सकाळी 10 वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली. नेते, उमेदवारांसह नागरिकांचीही उत्कंठा शिगेला पोहोचली होती. पाचव्या फेरीपर्यंत कोण बाजी मारू शकेल, हे चित्र स्पष्ट होऊ शकले नसल्याने सर्वांचीच धाकधूक वाढली होती. सहाव्या फेरीमध्ये भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अशोक इंगळे हे तीन हजार मतांनी पुढे असल्याचे समजताच कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधाण आले. यानंतर निकालाचे चित्र स्पष्ट झाले. लगेच भाजप कार्यकर्त्यांनी ढोलताशांचा गजर, गुलालाची उधळण करीत जल्लोष सुरू केला. 

गोंदियात प्रभाग क्रमांक एकमधून भाजपचे घनश्‍याम पानतावणे, विमला मानकर, प्रभाग क्रमांक दोनमधून राष्ट्रवादीचे हेमंत पंधरे, कुंदा पंचबुद्धे, तीनमधून भाजपचे विवेक मिश्रा, अनिता मेश्राम, चारमधून राष्ट्रवादीचे सतीश देशमुख, सविता मुदलीयार, पाचमधून भाजपच्या रत्नमाला शाहू, अपक्ष सचिन शेंडे, सहामधून भाजपच्या भावना कदम, अफसाना पठाण, सातमधून कॉंग्रेसचे क्रांती जायस्वाल, शीलू ठाकूर, आठमधून कॉंग्रेसचे शकील मन्सुरी, श्‍वेता पुरोहित, नऊमधून भाजपचे जितेंद्र पंचबुद्धे, आशालता चौधरी, प्रभाग 10 मधून भाजपच्या मैथुला बिसेन, दीपक बोबडे, 11 मधून भाजपच्या हेमलता पतेह, धर्मेश अग्रवाल, 12 मधून भाजपचे शिव शर्मा, मोसमी परिहार, 13 मधून बसपच्या गौसिया शेख, कॉंग्रेसचे सुनील भालेराव, 14 मधून बसपचे कल्लू यादव, ज्योत्स्ना मेश्राम, 15 मधून भाजपच्या नीतू बिरीया, दिलीप गोपलानी, 16 मधून बसपच्या ललिता यादव, संकल्प खोब्रागडे, 17 मधून कॉंग्रेसच्या निर्मला मिश्रा, राष्ट्रवादीचे विनीत शहारे, 18 मधून भाजपच्या वर्षा खरोले, विजय रगडे, 19 मधून शिवसेनेचे राजू कुथे, नेहा नायक, 20 मधून राष्ट्रवादीच्या मालती कापसे व कॉंग्रेसचे सुनील तिवारी, प्रभाग क्र. 21 मधून कॉंग्रेसच्या दीपिका रुसे व भागवत मेश्राम निवडून आले. 

गोंदियात अशोक इंगळेंचा 5 हजार 949 मतांनी विजय 
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे अशोक इंगळे यांनी 24 हजार 500 मते घेतली, तर राष्ट्रवादीचे अशोक गुप्ता यांना 18 हजार 551 मते मिळाली. 5 हजार 949 मतांनी इंगळेंचा विजय झाला. 

तिरोडा येथे प्रभाग क्रमांक एकमधून भाजपच्या राखी गुणेरिया, संतोष मोहने, दोनमधून भाजपचे विजय बन्सोड, अनिता अरोरा, तीनमधून राष्ट्रवादीच्या द्वारका भोंडेकर व प्रभू असाटी, चारमधून राष्ट्रवादीच्या रश्‍मी बुराडे, अपक्ष अशोक असाटी, पाचमधून शिवसेनेचे सुनील पालांदूरकर व भावना चवळे, भाजपच्या श्‍वेता मानकर, सहामधून राष्ट्रवादीच्या ममता हट्टेवार, अजय गौर, सातमधून राष्ट्रवादीचे जगदीश कटरे, किरण डहारे, आठमधून राष्ट्रवादीचे सुनील श्रीरामे व नरेश कुंभारे निवडून आले. 
नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या सोनाली देशपांडे यांनी ममता बैस यांचा पराभव केला. सोनाली देशपांडे यांना 5 हजार 987, तर ममता बैस यांना 5 हजार 892 मते मिळाली. 

विजयी मिरवणुकीला गालबोट 
गोंदिया :
निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या विजयी मिरवणुकीदरम्यान सामाजिक न्यायमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यालयासमोर भाजपचे शहराध्यक्ष सुनील केलनका यांना भाजपच्या पराभूत उमेदवार श्रद्धा अग्रवाल यांचे पती अभय यांनी आपल्या साथीदारांसह जाऊन मारहाण केली. या घटनेमुळे विजयी मिरवणुकीला गालबोट लागले.

Web Title: BJP won Gondia Municipal Council