भाजपने जिंकली "दंगल' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

नगराध्यक्ष 
भाजप 5 
कॉंग्रेस 2 
विदर्भ माझा 1 
नगरविकास आघाडी -1 

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा असल्याने नागपूरमधील नगरपालिकांच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मुख्यमंत्र्यांनी नऊपैकी पाच नगराध्यक्ष निवडून आणून ग्रामीण भागातही आपले वर्चस्व निर्माण केले असल्याचे निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले. 

भाजपच्या विजयी घोडदौडीत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना धूळदाण उडाली. शिवसेनेला आपला परंपरागत रामटेकचा गड शाबूत ठेवता आली नाही तर तब्बल पंधरा वर्षे राज्य केलेल्या काटोल विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच मंत्री अनिल देशमुख यांनी नरखेड आणि काटोल दोन्ही नगरपालिका गमावल्या. नरखेडमधून राष्ट्रवादीने आठ जागा जिंकल्याने त्यांची थोडीफार इभ्रत राखली. येथील आमदार आशीष जयस्वाल यांचाही करिष्मा दाखवता आला नाही. सावनेर विधानसभा मतदारसंघाचे दभंग आमदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील केदार यांनाही जोरदार फटका बसला. मोहपा नगरपालिकेत त्यांना अनपेक्षित यश मिळाले असले तरी सावनेर, खापा व कळमेश्‍वर या तीन नगरपालिका त्यांच्या हातून गेल्या. विशेष म्हणजे सावनेर व खापा त्यांचा बालेकिल्ला समजला जातो. कामठी नगरपालिकेत राज्याचे ऊर्जा व जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी प्रतिष्ठापणाला लावली होती. कामठीच्या विकासासाठी कोट्यवधींच्या घोषणा केल्या. मोठ्या प्रमाणात निधी वळता केला. जोखीम नको म्हणून माजी राज्यमंत्री ऍड. सुलेखा कुंभारे यांच्या बहुजन रिपब्लिकन एकता मंचसोबत त्यांनी युती केली. एवढे करूनही कॉंग्रेसने त्यांना हिसका दाखवला. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी आपले संपूर्ण लक्ष कामठीवर केले होते. त्याचा फायदा मुळक यांना झाला. दुसरीकडे मुळक यांना उमरेड नगरपालिका गमवावी लागली. उमरेडचे आमदार सुधीर पारवे यांनी येथील भदोरिया गटाला भाजपच्या भगव्याखाली आणणे चांगलेच पथ्यावर पडले. विजयालक्ष्मी भदोरिया नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या तर भाजपने येथे तब्बल 19 जागांवर विजय संपादन केला. काटोल नगरपालिकेच्या निवडणुकीत वाटाघाटी फिस्कटल्याने चरणसिंग ठाकूर भाजपातून बाहेर पडले. यांनी विदर्भ माझा पक्षाकडून उमेदवार दाखल केले. यात त्यांना भरभरून यश मिळाले. ठाकूर यांची मर्जी राखली असती तर भाजपच्या खात्यात आणखी एका नगराध्यक्षाची भर पडली असती. 

रामटेक 
माजी आमदार आशीष जयस्वाल यांचे रामटेक नगरपालिकेवर वर्चस्व होते. शिवसेनेने बिकेंद्र महाजनला उमेदवारी दिल्याने सेनेचे रमेश कारेमोरे यांनी बंडखोरी केली. याचा फायदा भाजपच्या दिलीप देशमुख यांनी उचलला. कारेमोरे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली. 

सावनेर-खापा 
सावनेर आमदार सुनील केदार यांचा बालेकिल्ला समजला जातो. सावनेर आणि खापा नगरपालिकेत मतदान झाल्यानंतरही कॉंग्रेसच विजयी होईल असा दावा सर्वचजण करीत होते. मात्र, निकालाने केदार यांना जबर धक्का बसला. या दोन जागेपैकी कळमेश्‍वरचीही जागा त्यांनी गमावली. फक्त मोहपा नगरपालिकेने त्यांना अनपेक्षित साथ दिली. 

काटोल 
काटोलमध्ये सुरुवातीपासूनच खिचडी होती. चरणसिंग ठाकूर यांनी नेहमीप्रमाणे आपला वेगळा गट स्थापन केला. विदर्भ माझा नवा पक्षाला त्यांनी खाते उघडून दिले. वैशाली ठाकूर येथून निवडून आल्या. त्या खालोखाल शेकापने धडक मारली. कॉंग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला येथे फारसे येथे यश मिळविता आले नाही. आमदार डॉ. आशीष देशमुख यांनी भरपूर मेहनत घेऊनही भाजपला येथे नोंद घेण्याजोगी कामगिरी करता आली नाही. 

नरखेड 
नरखेड तालुक्‍यात माजी मंत्री अनिल देशमुख अनिल देशमुख यांचा दबदबा होता. विधानसभेत त्यांचे पुतणे डॉ. आशीष देशमुख यांनी धक्का दिला. यामुळे मरगळ झटकून देशमुख पुन्हा नगरपालिकेत सक्रिय झाले. त्यांनी पुतण्याने केलेल्या पराभवाचा बचपा काढला. विशेष म्हणजे आशीष देशमुख यांचे मेव्हणे यांनी बंडखोरी करून अपक्ष दावेदारी दाखल केली होती. येथे भाजपला खातेही उघडता आले नाही. नगरविकास आघाडीचे अभिजित गुप्ता नगराध्यक्षपदी निवडून आले. 

उमरेड 
उमरेडमध्ये आमदार सुधीर पारवे यांना भदोरिया गटाला भाजपात आणणे चांगलेच फायद्याचे ठरले. येथे भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार विजयालक्ष्मी भदोरिया निवडून आल्या तसेच तब्बल 19 जागा भाजपचे जिंकल्या. उमरेडमध्ये माजी राज्यमंत्री तसेच कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांना आपला करिष्मा दाखवता आला नाही. 

नगरपालिका....... नगराध्यक्ष (पक्ष)...............प्रबळ पक्ष (संख्या बळ) 
1. सावनेर............ रेखा मोवाडे, (भाजप)...............भाजप (14 जागा) 
2. उमरेड.............. विजयलक्ष्मी भदोरिया, (भाजप)........ भाजप (19) 
3. खापा...............प्रियांका मोहिते, (भाजप)...............भाजप (15) 
4. कळमेश्‍वर...........स्मृती इखार, (भाजप)...............कॉंग्रेस (8) 
5. रामटेक............. दिलीप देशमुख, (भाजप)...............भाजप (13) 
6. कामठी............. मोहम्मद शहाजहा अन्सारी, (कॉंग्रेस)........ कॉंग्रेस (15) 
7. मोहपा..............शोभा कऊटकर, (कॉंग्रेस)...............कॉंग्रेस (10) 
8. काटोल.............वैशाली ठाकूर, (विदर्भ माझा) विदर्भ माझा........(विदर्भ माझा 18) 
9. नरखेड.............अभिजित गुप्ता, (नगरविकास आघाडी)..........राष्ट्रवादी (8) 

पक्षीय बलाबल 
नगरसेवक 
भाजप- 80 
कॉंग्रेस- 49 
राष्ट्रवादी - 10 
शिवसेना - 10 
शेकाप- 4 
विदर्भ माझा- 18 
इतर- 13 
एकूण जागा - 184 
------------------------------ 
एकूण नगर परिषद - 9 
एकूण प्रभाग- 90 
एकूण नगरसेवक उमेदवार- 762 
एकूण- नगराध्यक्ष उमेदवार- 66 
-------------------------------------- 
रामटेक 
एकूण जागा -17 
प्रभाग- 8 
नगरसेवक उमेदवार- 79 
नगराध्यक्ष उमेदवार- 7 
भाजप -13 
कॉंग्रेस-02 
शिवसेना-02 
नगराध्यक्ष- दिलीप देशमुख (भाजप) 
------- 
खापा 
एकूण 17 जागा 
प्रभाग- 9 
नगरसेवक उमेदवार- 63 
नगराध्यक्ष उमेदवार- 5 
भाजप-15 
कॉंग्रेस-01 
अपक्ष-01 
नगराध्यक्ष प्रियांका मोहिटे (भाजप) 
---- 
कळमेश्‍वर 
एकूण 17 जागा 
प्रभाग 9 
नगरसेवक उमेदवार- 68 
नगराध्यक्ष उमेदवार- 8 
विजयी सदस्य 
भाजप - 5 
कॉंग्रेस -8 
शिवसेना -2 
राष्ट्रवादी -2 
नगराध्यक्ष स्मृती इखार (भाजप) 
--- 
सावनेर 
एकूण जागा 20 
प्रभाग - 10 
नगरसेवक उमेदवार- 75 
नगराध्यक्ष उमेदवार- 5 
विजय सदस्य 
भाजप-14 
कॉंग्रेस-06 
नगराध्यक्ष रेखा मोवाडे (भाजप) 
---- 
उमरेड 
एकूण जागा 25 
प्रभाग- 12 
नगरसेवक उमेदवार- 23 
नगराध्यक्ष उमेदवार- 5 
विजयी सदस्य 
भाजप- 19 
कॉंग्रेस- 6 
नगराध्यक्ष - विजयलक्ष्मी भदोरिया, भाजप 
--------------------------------------- 
नरखेड 
एकूण जागा 17 
प्रभाग- 8 
नगरसेवक उमेदवार- 72 
नगराध्यक्ष उमेदवार- 8 
विजयी सदस्य 
राष्ट्रवादी- 8 
शिवसेना- 3 
नगर विकास आघाडी - 5 
अपक्ष - 1 
नगराध्यक्ष - अभिजित गुप्ता (अपक्ष -नगर विकास आघाडी) 
--- 
कामठी 
एकूण जागा - 31 
प्रभाग - 16 
नगरसेवक उमेदवार- 190 
नगराध्यक्ष उमेदवार- 12 
कॉंग्रेस- 16 
भाजप- 8 
शिवसेना-1 
बसप-1 
एमआयएम- 1 
बरिएमं- 2 
अपक्ष-2 
--------- 
काटोल 
एकूण जागा- 23 
प्रभाग - 11 
नगरसेवक उमेदवार- 114 
नगराध्यक्ष उमेदवार- 9 
विदर्भ माझा-18 
शेकाप-04 
भाजप-01 
नगराध्यक्ष वैशाली ठाकूर (विदर्भ माझा) 
--- 
मोहपा 
एकूण जागा - 17 
प्रभाग- 8 
नगरसेवक उमेदवार- 68 
नगराध्यक्ष उमेदवार- 7 
कॉंग्रेस- 10 
भाजप- 5 
शिवसेना - 2 
नगराध्यक्ष - शोभा कऊटकर (कॉंग्रेस) 

Web Title: BJP won in nagpur