सर्वसामान्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्याचे काम भाजपने केले : विजय रहांगडाले

तिरोडा : प्रचारदौऱ्यात सहभागी विजय रहांगडाले व भाजपचे कार्यकर्ते.
तिरोडा : प्रचारदौऱ्यात सहभागी विजय रहांगडाले व भाजपचे कार्यकर्ते.

तिरोडा (गोंदिया)  : विधानसभा क्षेत्राचा विकास मागील पाच वर्षांत जेवढा झाला तेवढा यापूर्वी कधीच झाला नव्हता. भाजप सरकारच्या कार्यकाळात मतदारसंघातील रस्ते, सिंचनाची समस्या मार्गी लावली. धानाला प्रथमच 500 रुपये बोनस मिळाला. दुष्काळी परिस्थितीत कर्जाच्या डोंगराखाली आलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली. कामगारांसाठी पेन्शन योजना लागू केली. सर्वसामान्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी विविध जनकल्याणकारी योजना भाजप सरकारने राबविल्या, असे प्रतिपादन भाजप-शिवसेना- आरपीआय (आ) महायुतीचे उमेदवार विजय रहांगडाले यांनी केले. तिरोडा विधानसभा क्षेत्रातील गावांमध्ये पदयात्रा काढल्यानंतर मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
निवडणूक प्रचारार्थ बुधवारी विजय रहांगडाले यांनी तिरोडा क्षेत्रातील तिरोडा शहर, परसवाडा, अर्जुनी, गोंडमोहाडी किंडगीपार, मुरदाडा, महालगाव, लोधीटोला, धापेवाडा, पिपरटोला, देऊटोला बिजईटोला, वळद, कारूटोला या गावांमध्ये पदयात्रा काढली. या पदयात्रेत त्यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्तेसुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रत्येक गावांत फुलांची उधळण करून गावकरी विजय रहांगडाले यांचे स्वागत करीत होते. प्रचारसभेत मार्गदर्शन करताना रहांगडाले म्हणाले, भाजप सरकारच्या कार्यकाळात मतदारसंघातील रस्ते, सिंचनाची समस्या मार्गी लावली. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली. कामगारांसाठी पेन्शन योजना लागू केली. या क्षेत्रातील विकासकामांची गंगा सतत वाहत ठेवण्यासाठी जनतेची साथ आणि आशीर्वादाची गरज आहे. तिरोडा क्षेत्राच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com