काळ्या पंखांचा कोकीळ-खाटीकची विदर्भातील पहिली नोंद यवतमाळात

Black-winged cuckoo killer found in Yavatmal
Black-winged cuckoo killer found in Yavatmal

यवतमाळ : शहरालगतच्या चौसाळा जंगल क्षेत्रात नियमित पक्षी निरीक्षण करण्यात आले. यावेळी आयू सी एन रेड डेटा लिस्टनुसार मुबलक असला तरी महाराष्ट्रासाठी दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या व ई बर्डच्या वेब साइटवर या पूर्वी नोंद नसलेल्या काळ्या पंखांचा कोकीळ-खाटीक याची विदर्भातील ई बर्डच्या आधारे पहिली नोंद यवतमाळात प्राणिशास्त्राचे प्रा. डॉ. प्रवीण जोशी यांनी घेतली आहे.

काळ्या पंखांचा कोकीळ-खाटीक हा दक्षिण ते दक्षिणपूर्व आशियामध्ये सामान्यतः ईशान्य पाकिस्तानमधून खालच्या हिमालयी प्रदेशात आढळतो. जसे उत्तरांचल, नेपाळ, अरुणाचल प्रदेश व पूर्वोत्तर म्यानमारच्या टेकड्यांमध्ये व चीन, दक्षिणपूर्व आशियात आढळतात. ते हिवाळा हिमालयाच्या पायथ्याशी घालतात. कधीकधी लांब अंतर उदा. केरळपर्यंत येतात. हा एक मध्यम आकाराचा, गडद काळा-पिसारा व राखाडी रंगाचा आहे.

पिसाराखालील धूसर असतो. डोळ्या भोवती पांढरी किनार या पक्ष्याची खास ओळख आहे. पक्षी निरीक्षणादरम्यान अत्यंत उंच झाडे असलेल्या भागात सूर्यप्रकाश फारच कमी असताना अचानक लक्ष गेले. तेव्हा नर उडाला. परंतु, मादाचा लक्षात येण्याएव्हडा हा तोच पक्षी आहे. हे समजण्या येवढा फोटो मिळाला.

निनाद अभंग पुर्णे यांनी चार वर्षांपूर्वी ई बर्डच्या साह्याने या पक्ष्याच्या स्थलांतराचा एक नकाशा तयार केला होता. तेव्हा तो महाराष्ट्रातून कोणत्या जिल्ह्यातून जाऊ शकतो, हेसुद्धा भाकीत केले होते ते आज सत्य झाले. त्यांनी व नंदकिशोर दुधे यांनीही या काळ्या पंखांचा कोकीळ-खाटीक असण्याची माझ्यासोबतच पुष्टी केली.

जिल्ह्याची पक्षीगणना ३४४ झाली
यवतमाळातील ही नोंद विदर्भासाठी व महाराष्ट्रासाठीसुद्धा पक्षी निरीक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. आज यवतमाळच्या पक्षी वैभवात एका दुर्मिळ पक्ष्याच्या नोंदीने भर पडून यवतमाळ जिल्ह्याची पक्षीगणना ३४४ झाली आहे. भविष्यात पक्षी अधिवास वाचले, तर अशा अनेक नोंदी मिळतील. निरंतर पक्षी अभ्यासाचे कार्य अधिक जोमाने करण्याचे बळ अशा नोंदींमुळे मिळते.
- प्रा. डॉ. प्रवीण जोशी,
प्राणीशाश्‍त्राचे अभ्यास, यवतमाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com