अश्‍लील शूटिंग करून ब्लॅकमेल

Facebook
Facebook

नागपूर - फेसबुकवरून फ्रेंडशिप झाल्यानंतर शारीरिक संबंधाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन कुमार आर. गवडी (रा. मांचेरीयल, आदिलाबाद-तेलंगणा) याने विवाहितेला आठ लाखांनी लुबाडल्याचा प्रकार समोर आला आहे. गिट्टीखदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३२ वर्षीय रेखा (बदललेले नाव) ही गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. २१ जुलै २०१७ मध्ये फेसबुकवरून तिची तेलंगणातील कुमारशी ओळख झाली. त्यांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक दिले व व्हॉट्‌सॲपवरून संवाद सुरू झाला. कालांतराने त्यांच्यात प्रेम झाले. काही दिवसांनी रेखा त्याला भेटायला हैदराबादला गेली. त्यावेळी कुमारने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कुमारने तिच्यासोबत केलेल्या शारीरिक संबंधाचे मोबाईलने शूटिंग केले. 

तसेच काही अश्‍लील फोटोसुद्धा काढले. ती नागपुरात परतताच अश्‍लील व्हिडिओ फेसबुकवर टाकण्याची धमकी दिली व प्रथम १४ हजार रुपये बॅंक खात्यात जमा करण्यास सांगितले. बदनामीच्या भीतीने तिने पैसे दिले. कालांतराने त्याची हिंमत वाढली. त्यानंतर वारंवार तिच्याकडून पैसे उकळू लागला.

एक दिवस कुमार नागपुरात आला व रेखाच्या घरी थांबला होता. परतीच्या वेळी कुमार तिच्या घरातील दागिने घेऊन गेला. अश्‍लील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन कुमारने तिच्याकडून आतापर्यंत आठ लाख रुपये उकळले आहे. त्यानंतरही तो पैसे देण्यासाठी तगादा लावत होता.

भविष्यात पूर्णपणे लुटल्यानंतरही तो सोडणार नाही, याची जाणीव झाल्यामुळे तिने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पती असतानाही ‘लिव्ह इन’मध्ये
रेखा ही खासगी कुरिअर सर्व्हिस सेंटर चालविते. तिला पती व १२ वर्षांची मुलगी आहे. तिच्या पतीला हृदयविकाराचा झटका आल्याने अंथरुणावर आहे. यादरम्यान तिची कुमारशी मैत्री झाली. दोन महिन्यांसाठी कुमार रेखाकडे मुक्‍कामी थांबला होता. पती असतानाही ती ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com