निंदनीय! महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह मजकूर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

नागपूर  : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासंदर्भात गलिच्छ भाषेत आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट केल्याने नोइंग गांधीझम ग्लोबल फ्रेंड्‌स ग्रुपच्या सदस्यांनी शुक्रवारी सीताबर्डी ठाण्यात तक्रार दिली. आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या मयूर जोशीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे.

तक्रारीनुसार, मयूर जोशी नावाने असलेल्या फेसबुक अकाउंटवरून "विश्‍वंभर जरा उत्तर दे' अशी पोस्ट टाकली आहे. ही पोस्ट डॉ. विश्‍वंभर चौधरी यांनी इस्रोच्या चांद्रयान मोहिमेसंदर्भात केलेल्या लिखाणावरील प्रतिक्रिया आहे. परंतु, त्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासंदर्भात अत्यंत चुकीचे आरोप करीत बदनामीचा प्रयत्न करण्यात आला आहे. महात्मा गांधी यांची आसाराम बापूसोबत तुलना करण्यासह त्यांच्यासाठी शिवराळ भाषेचा वापर केला आहे.
मयूर जोशीचा उद्देश हा महात्मा गांधी यांची बदनामी करणे व जाणीवपूर्वक अप्रचार करण्याचा आहे. या लिखाणामुळे गांधीवादी विचारसरणीच्या लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. अश्‍लाघ्य भाषेतील या लिखाणामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची भीती तक्रारीतून व्यक्त केली आहे. जोशीने पोस्ट डिलीट केली असली तरी तक्रारकर्त्यांनी त्याचा स्क्रिनशॉट घेऊन पुराव्यादाखल तक्रारीसोबत जोडण्यात आला आहे. सातत्याने गांधींविरुद्ध लेखन करणाऱ्या जोशीविरुद्ध गुन्हा दाखल करून करवाई करण्याची मागणी तक्रारीतून केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blasphemous! Offensive text about Mahatma Gandhi