निंदनीय! रुग्णाच्या नातेवाइकांचा डॉक्‍टरांवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

कामठी (जि. नागपूर) : शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश द्विवेदी यांच्यावर आज मंगळवारी दुपारी एका रुग्णाच्या नातेवाइकांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेचा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे.

कामठी (जि. नागपूर) : शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश द्विवेदी यांच्यावर आज मंगळवारी दुपारी एका रुग्णाच्या नातेवाइकांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेचा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आपत्कालीन विभागात वैद्यकीय अधिकारी डॉ. द्विवेदी कर्तव्यावर असताना पायांवर जखमा असलेला एक 17 वर्षीय तरुण त्याच्या पालकांसह रुग्णालयात आला. उपचारादरम्यान पालकांनी रुग्णाला इंजेक्‍शन देण्याचा आग्रह धरला. डॉ. द्विवेदी यांनी त्यांना सांगितले की परिचारिका दुपारच्या जेवणासाठी गेली असल्याने रुग्णाला इंजेक्‍शन नंतर दिले जाईल. "निमित्त' पाहून संतापलेल्या, रुग्णाच्या वडिलांनी डॉ. द्विवेदी यांच्याशी वादविवाद केला. परिस्थिती गंभीर बनली जेव्हा रुग्णाच्या वडिलांनी डॉक्‍टरांवर हल्ला केला आणि त्यांना जबर मारहाण केली. रुग्णालयाच्या इतर कर्मचाऱ्यांनी वेळेवर केलेल्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीदास कठाळे यांच्या नेतृत्वात जुनी कामठी पोलिस स्टेशनचे पथक रुग्णालयात दाखल झाले आणि तपास सुरू केला. त्यादरम्यान, अज्ञात हल्ला करणाऱ्याने त्याचे नाव आणि रुग्णाचे नाव नोंदविलेले कागदपत्रांसह रुग्णालयातून पळ काढला. आरोपींना ओळखण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले. या प्रकरणाचा तपास जुनी कामठी पोलिस करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Blasphemous! Patients' relatives attack to doctors