सोसायटीच्या रहिवाशांनी दिला रक्तदानाचा संदेश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

नागपूर : ऍम्बिशन क्रिएटिव्ह शैक्षणिक सोशल मल्टिमोटो सोसायटीतर्फे नुतकेच बेसारोड येथील उत्कर्ष सोसायटी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

रक्तदानाबद्दल समाजामध्ये जनजागृती व्हावी, रक्तदानासंदर्भात नागरिकांमध्ये
असलेले गैरसमज दूर व्हावे. एखाद्याच्या रक्तदानाने अनेकदा एखाद्या व्यक्‍तीचा जीव वाचविणे शक्‍य होते. याच उद्देशाने सोसायटीतर्फे हे शिबिर घेण्यात आले.

यावेळी सोसायटीतील 21 रक्तदात्यांनी स्वच्छेने रक्तदान केले. सोसायटीच्या अध्यक्ष शिल्पा मिश्रा, अजित मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. यशेस्वितेसाठी गौरी सिद्धमशेट्टीवार, आस्था आमटे, शारदा कांबळे, सचिन शेंडे यांनी सहकार्य केले. शिबिराला आयुष्य रक्तपेढीचे सहकार्य लाभले.

Web Title: blood donation at nagpur

टॅग्स