रक्ताच्या मोबदल्यात मागितले शरीरसुख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

सुरक्षेवर नियंत्रण काेणाचे?
सुपर स्पेशालिटी हाेऊ घातलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एेरणीवर आला आहे. कधी डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे रुग्णांचा मृत्य, तर कधी परिसरात कचऱ्यात अर्भक आढळून येण्याच्या घटना वाढल्या आहेत. येवढेच नव्हे, तर रुग्णालयाती काम लवकर मार्गी लावून देण्यासाठी दलालही सक्रीय आहेत. हे सर्व सुरू असताना आता शरीरसूखाचीही मागणी येथे हाेऊ लागल्याने, सर्वाेपचारमधील सुरक्षा व्यस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

अकोला : रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते. पण, त्याच रक्ताचा सौदा हाेताे तेव्हा माणुसकीला काळीमा फासल्या जाते. असाच काहीसा सौदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाला. हा सौदा हाेता रक्ताच्या बदल्यात शरीरसूखाचा. या प्रकरणी पीडित महिलेने पोलिस चौकीत तोंडी तक्रार दिली असून, पुढील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

प्राप्त माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात वाॅर्ड क्रमांक १७ मध्ये दाखल झालेल्या एका महिलेला रक्ताची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे रुग्ण महिलेची सूनने रक्त मिळवण्यासाठी रुग्णालयात प्रयत्न सुरू केले. शासकीय रक्तपेढीत अनेकांना सहजासहजी रक्त मिळत नाही. त्या महिलेला देखील रक्त मिळाले नाही. त्या महिलेने रुग्णालयातील एका सफाई कामगाराकडे रक्ताबाबत विचारणा केली. तीच्या अगतीकतेचा फायदा उचलण्याच्या इराद्याने या सफाई कामगाराने तीच्याकडे चक्क शरीरसुखाची मागणी केली. शरीरसुख दिल्यास रक्त आणि औषध मिळवून देण्याचे आमिष या सफाई कामगाराने दाखविले. या धक्कादायक प्रकारानंतर महिलेने थेट सर्वाेपचारमधील पोलिस चौकी गाठली अन् पोलिसांच्या कानावर घडलेला प्रकार घातला. पोलिसांनी तातडीने रुग्णालय प्रशासनासाेबत संपर्क साधला. महिलेने लेखी तक्रार दिल्यास कारवाई करण्याचे पोलिसांनी सांगितले. वृत्त लिहिस्ताेवर या प्रकरणी लेखी तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.

पुन्हा दलाल सक्रीय
अकोलाच नव्हे, तर लगतच्या जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी येथील सर्वोपचार रुग्णालय आधारवड ठरले आहे; परंतु रुग्णालयात रुग्णांच्या नशिबी हेलपाटेच येतात. येथे रुग्णांना याेग्य मार्गदर्शन हाेत नसल्याचा फायदा दलाल घेत आहेत. यापूर्वी पैशांसाठी, तर आता चक्क शरीरसूखासाठी रक्ताचा सौदा सर्वाेपचारमध्ये हाेऊ लागला आहे.

सुरक्षेवर नियंत्रण काेणाचे?
सुपर स्पेशालिटी हाेऊ घातलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एेरणीवर आला आहे. कधी डॉक्टरांच्या निष्काळजीमुळे रुग्णांचा मृत्य, तर कधी परिसरात कचऱ्यात अर्भक आढळून येण्याच्या घटना वाढल्या आहेत. येवढेच नव्हे, तर रुग्णालयाती काम लवकर मार्गी लावून देण्यासाठी दलालही सक्रीय आहेत. हे सर्व सुरू असताना आता शरीरसूखाचीही मागणी येथे हाेऊ लागल्याने, सर्वाेपचारमधील सुरक्षा व्यस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

रुग्णालय प्रशासनाने दिली समज 
पिडीत महिलेने तीच्या सोबत झालेला प्रकार पोलिसांना सांगितल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने त्याची दखल घेतली. महिलेने लेखी तक्रार दिली नसल्यामुळे प्रशासनाने या सफाई कामगाराविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. केवळ समज देऊन त्याला सोडून दिले. महिलेने लेखी तक्रार दाखल केल्यास या सफाई कामगाराविरुद्ध कारवाई करता येईल, असे वैद्यकीय महाविद्यालयातील एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.

Web Title: blood donation racket in Akola government hospital