गुरुपौर्णिमेच्या रात्री 'ब्लड मून'चे दर्शन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जुलै 2018

ग्रहण स्पर्श, रात्री 1 वाजता सन्मिलन, 1.52 मि. मध्य 2.52 उन्मीलन व 28 जुलाई 2018 ला सकाळी 3.49 मि. मोक्ष जवळपास 4 तास मोठे हे खग्रास चंद्र ग्रहण होते. चंद्र ग्रहणाच्या खग्रास स्थितीत चंद्र असा रक्तरंजीत (ब्लड मुन) दिसत होता. 

यवतमाळ : आषाढ पौर्णिमेला म्हणजेच शुक्रवार, ता. २७ जुलै २०१८ला गुरुपौर्णिमेच्या रात्री संपूर्ण भारतीयांनी खग्रास चांद्रग्रहणाचा अद्भुत नजारा डोळ्यात साठवून साक्षात 'ब्लड मुन'चे दर्शन घेतले.

गुरुपौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण असा योग कदाचीतच येतो. त्यामुळे सर्वांच्या नजरा, कॅमेरे व दुर्बिणी रात्री या अद्भुत प्रसंगाची प्रतीक्षा करीत होते. परंतु, ढगाडी वातावरणामुळे ते शक्य होत नव्हते. खग्रास चंद्र ग्रहणाच्या 'ब्लड मुन'चे छायाचित्र शुक्रवार ता. 27 जुलाई 2018 चे रात्री 11 वाजून 54 मिनिटांनी कमेरबद्ध करण्यात आमच्या प्रतिनिधींना अखेर यश आले.

ग्रहण स्पर्श, रात्री 1 वाजता सन्मिलन, 1.52 मि. मध्य 2.52 उन्मीलन व 28 जुलाई 2018 ला सकाळी 3.49 मि. मोक्ष जवळपास 4 तास मोठे हे खग्रास चंद्र ग्रहण होते. चंद्र ग्रहणाच्या खग्रास स्थितीत चंद्र असा रक्तरंजीत (ब्लड मुन) दिसत होता. 

Web Title: blue moon seen in the sky