येणी पांढरीत आढळले दोघांचे मृतदेह ! घातपाताची शक्यता

एकाच चाकूवर दोघांचेही हात
two kidnapped
two kidnappedsakal

परतवाडा: अचलपूर तालुक्यातील येणी पांढरी शिवारात महिला व पुरुषाचा मृतदेह आढळला. बुधवारी (ता. २३) सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. हत्या की आत्महत्या, याबाबत संभ्रम कायम आहे.

two kidnapped
ब्रॅंड असली, आतमध्ये माल नकली?

सुधीर बोबडे (वय ५२) व एका ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत एकाच ठिकाणी आढळून आला. सदर महिला मंगळवारपासून (ता. २२) बेपत्ता होती. कुटुंबातील सदस्यांनी संबंधित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार रात्रीच परतवाडा पोलिसांत नोंदविली. त्यानंतर बारा तासांच्या आत दुसऱ्या दिवशी येणी पांढरी येथील राकेश अग्रवाल यांच्या शेतात रक्तबंबाळ अवस्थेत महिला व पुरुषाचा मृतदेह आढळला. दोघांचेही मृतदेह शेतातील एका खोलीत भिंतीलगत बसलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यापैकी सुधीर यांच्या डोळ्यांवर काळ्या रंगाचा गॉगल कायम आहे. शिवाय दोघांच्याही गळ्यावर धारदार शस्त्राने कापल्याच्या जखमा आढळून आल्या. मृत पुरुष आणि महिला दोघांची ओळख पटल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना घटनेसंदर्भातील माहिती देण्यात आली. आधी एकाने दुसऱ्याची हत्या करून नंतर स्वतः आत्महत्या केल्याची शक्यताही या घटनेनंतर काहींनी व्यक्त केली. परतवाडा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागारात पाठविले.

two kidnapped
आजोबांच्या हत्येनंतर नातवाने घरीच पुरला मृतदेह; महिन्याभरानंतर प्रकार उजेडात

दोघेही कांडली परिसरात राहत असून विवाहित असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. वृत्त लिहीस्तोवर पोलिस ठोस निष्कर्षापर्यंत पोहचू शकले नाही.

या घटनेनंतर फॉरेन्सिक लॅबची चमू आणि श्वानपथकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दोघांच्याही कुटुंबीयांकडे पोलिसांची चौकशी सुरू केली होती. त्याच चाकूने आधी कुणी कुणाची हत्या केली आणि नंतर स्वतःला संपविले, याबाबत पोलिस अधिकारीदेखील काहीच भाष्य करायला तयार नव्हते. परतवाडा पोलिसांनी प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यू, अशी नोंद घेतली.

दोघांच्याही शरीरावर नेमक्या किती आणि कशा पद्धतीच्या जखमा आहेत, याबाबतची तपासणी सुरू आहे. अद्याप पोलिस ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाही.

संतोष टाले, ठाणेदार, परतवाडा ठाणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com