बेपत्ता भावंडांचे मृतदेहच आढळले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

बेला : मागील सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह उमरेड तालुक्‍यातील बेल्लापारच्या जंगलात कुजलेल्या अवस्थेत सोमवारी आढळून आले. खून करून त्यांना फेकून दिले असावे अशी शंका व्यक्त केली जात आहे. संतोषसिंग तिलपितिया (वय 24) व संतगसिंग तिलपितिया (वय 22, दोघेही रा. महालगाव, ता. भिवापूर) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास महालगावच्या ग्रामस्थांना लगतच्या बेल्लापार जंगलातील एका नाल्यात झाडाच्या फांद्यांनी झाकून असलेले दोन मृतदेह आढळून आले. याची माहिती गावकऱ्यांनी बेला पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचानामा केला.

बेला : मागील सहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह उमरेड तालुक्‍यातील बेल्लापारच्या जंगलात कुजलेल्या अवस्थेत सोमवारी आढळून आले. खून करून त्यांना फेकून दिले असावे अशी शंका व्यक्त केली जात आहे. संतोषसिंग तिलपितिया (वय 24) व संतगसिंग तिलपितिया (वय 22, दोघेही रा. महालगाव, ता. भिवापूर) अशी मृतांची नावे आहेत. सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास महालगावच्या ग्रामस्थांना लगतच्या बेल्लापार जंगलातील एका नाल्यात झाडाच्या फांद्यांनी झाकून असलेले दोन मृतदेह आढळून आले. याची माहिती गावकऱ्यांनी बेला पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचानामा केला. बेला ठाण्यात दोन तरुणांची बेपत्ता तरुणांची तक्रार प्राप्त झाली होती. त्या तक्रारीमध्ये नमूद वर्णन मृतदेहांशी मिळत असल्याचे लक्षात आले. तक्रारकर्त्यांना बोलाविण्यात आल्यावर त्यांनी मृतदेहांवरील कपड्यांवरून दोघांची ओळख पटविली. मृतदेह सहा दिवसांपासून असल्याने कुजलेले असल्याने त्यांचा खून कसा करण्यात आला याची माहिती सध्याच देता येणार नाही, असे बेला पोलिसांनी सांगितले. दोन्ही भावंडाचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांना जंगलात फेकून दिले असावे व त्यावर झाडांच्या फांद्या झाकल्या असाव्यात, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी दोन्ही मृतदेहांना शवविच्छेदनासाठी नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात पाठविले आहे. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास बेलाचे ठाणेदार शिवाजीराव भांडवलकर, गणेश राय व चमू करीत आहेत.
झारे, पावशी विकण्याचा होता व्यवसाय
दोन्ही भावंडे लोखंडी झारे, पावशी, सराटे यासारखे स्वयंपाकगृहातील वस्तूंची विक्री गावोगावी करीत होते. यासोबतच मृत दोघे अवैध दारूवाहतुक करीत असल्याचे सूत्रांची माहिती आहे. मृतदेहांची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर नेमकी हत्या कशी व कधी झाली हे समोर येईल. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bodies of the missing brothers were found