जमिनीत पुरलेला मृतदेह सहा दिवसांनी काढला बाहेर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

चांदूरबाजार (अमरावती) : सहा दिवसांनंतर वडिलांनी मुलीच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय व्यक्त केल्यामुळे जमिनीत पुरलेला मृतदेह सोमवारी (ता. २६) पोलिसांनी शवविच्छेदनासाठी बाहेर काढला. तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली.

मूळ अकोट येथील रहिवासी प्रकाश विश्वनाथ तेलगोटे (वय ५०) यांनी रविवारी (ता. २५) शिरजगावकसबा ठाण्यात तक्रार केली. त्यात लहान मुलगी कोमल तेलगोटे (वय १६) हिच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला होता. त्यामुळे लाखनवाडी येथील स्मशानभूमीत तालुका दंडाधिका-यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला. श्री. तेलगोटे यांचे पत्नी व मुलांसोबत पटत नसल्यामुळे ते वेगळे राहतात. २० ऑगस्ट रोजी मोठी मुलगी शुभांगी हिने ङ्कोन करून कोमलची प्रकृती ठीक नसल्याने तातडीने गुणवंतबाबा मंदिरात येण्यास सांगितले. गावात पोहोचेपर्यंत कोमलचा मृत्यू झाला होता. लाखनवाडीत कोमलला मूठमाती देण्यात आली होती. वडिलांनी मुलीच्या मृत्यूबाबत घातपाताचा संशय व्यक्त केल्याने सहा दिवसांपूर्वी जमिनीत पुरलेला मृतदेह बाहेर काढून पुन्हा शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पाडली. या वेळी तहसीलदार नीलिमा मते प्रभारी पोलिस निरीक्षक प्रल्हाद पवार यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक संध्या साळकर उपस्थित होत्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The body buried in the ground was removed after six days