Murder : पत्नीच्या डेळ्यादेखत पतीचे अपहरण; तीन दिवसांनी आढळला मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death

पत्नीच्या डेळ्यादेखत पतीचे अपहरण; तीन दिवसांनी आढळला मृतदेह

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : कळंब तालुक्यातील तिरझडा येथील सुरेश श्यामराव पवार (वय ३४) या अपहरण केलेल्या युवकचा अखेर वर्धा नदीपात्रात मृतदेह आढळला. अपहरण करून त्याचा खून करण्यात आल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला.

कळंब तालुक्यातील तिरझडा येथील सुरेश शामराव पवार याचा मृतदेह वडकी पोलिस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या कारेगाव येथील वर्धा नदीच्या पात्रात आढळून आला. तिरझडा येथील माथा वस्तीतून सुरेश पवार याचे सोमवारी (ता. १५) रात्री ९.३० वाजतादरम्यान अनोळखी पाच ते सहा युवकांनी घरासमोरून ‘ज्ञानेश्वरी' असे लिहिलेल्या पांढऱ्या रंगाच्या कारमधून पत्नीसमोरच अपहरण केले होते.

हेही वाचा: नग्न फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवर अत्याचार

या घटनेची तक्रार पत्नी शालिनी सुरेश पवार (वय २५) हिने त्याच रात्री कळंब पोलिसात केली. त्याचा शोध सुरू असताना कारेगाव गावाजवळून वाहणाऱ्या वर्धा नदीच्या पात्रात दुपारी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती वडकी पोलिसांना मिळाली. वडकीचे ठाणेदार विनायक जाधव यांच्यासह उपनिरीक्षक मंगेश भोंगाडे यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची ओळख पटविण्यास मोहीम सुरू केली असता मृतदेह हा कळंब तालुक्यातील तिरझडा सुरेश पवार असल्याचे कळंब पोलिसांकडून व त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले.

loading image
go to top