तोतया अधिकारी महिलांचे दागिने घेऊन झाला पसार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती : शहरातील श्रीमजीवी लोकवस्ती दोन महिलांना गाठून घरकुल मंजूर झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच तातडीने पैसे भरावे असे सांगितले. पैसे नसल्याने दोन्ही महिलांनी पैशाऐवजी दागिने दिले. दागिने मिळताच या तोतया अधिकाऱ्याने पळ काढला.

गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत चिलमछावणी परिसरात गुरुवारी दुपारी साडेतीन ते पावणेचारच्या सुमारास एक व्यक्ती एकट्या महिलेला बघून तिच्या घरी पोहचला. त्याने सदर महिलेचा घरकुलाचा नंबर लागल्याचे सांगून, विश्‍वास संपादन केला. त्यानंतर २० हजार रुपयांची मागणी केली. नंबर लागल्याची माहिती कुणाला सांगू नका असे तोतयाने बजावले. महिलेने जवळ पैसे नसल्याचे सांगताच, तोतयाने, पतीनेच पैसे नसल्याने सोन्याचे दागिने घेऊन जाण्यास सांगितले. महिलेने तोतयावर विश्‍वास ठेवून घरकुलाच्या लाभासाठी वीस हजारांचे दागिने दिले. दागिने मिळताच तोतयाने चिलमछावणीतून पळ काढला. या प्रकरणाची तक्रार गाडगेनगर ठाण्यात दाखल करण्यात आल्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला.

त्यापूर्वी दुपारी बाराच्या सुमारास मिलचाळ नवीवस्ती बडनेरात सुद्धा तोतयाने एका महिलेस गाठून, घरकुल मंजूर झाले. ते तातडीने मिळवून देण्याचे आमीष दाखविले. त्यासाठी दहा हजारांची मागणी केली. त्याही महिलेजवळ पैसे नसल्याचे सांगता, तोतयाने त्या महिलेकडून गळ्यातील पोत, कानातील रिंग असे २० हजार ५०० रुपयांचे दागिने घेऊन पळ काढला. या प्रकरणात सुद्धा बडनेरा ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला.  

संपादन - नरेश शेळके

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com