बोन मॅरोच्या "रजिस्ट्री'ला मुहूर्त सापडेना 

केवल जीवनतारे - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 2 मार्च 2017

नागपूर - कॅन्सरसह अनेक गंभीर आजारांवर प्रभावी ठरणाऱ्या "बोन मॅरो'ची रजिस्ट्री तयार करीत सुमारे 50 हजार दात्यांची नोंद राज्यभरात करण्याचा संकल्प राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधनमंत्री गिरीश महाजन यांनी सोडला होता. त्यानुसार "बोन मॅरो'ची ही रजिस्ट्री नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) तयार करण्यात येणार होती. सप्टेंबर 2016 मध्ये उद्‌घाटन ठरले होते. परंतु सहा महिने उलटून गेल्यानंतरही रजिस्ट्रीच्या उद्‌घाटनाला मुहूर्त सापडला नाही. 

काही दिवसांपूर्वी आठ वर्षांच्या "झनक आणि बालाजी' यांना रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. गडचिरोलीसारख्या आदिवासी भागातील हे चिमुकले. उपचारासाठी पैसा नव्हता. "बोन मॅरो'हा एकच उपाय होता. परंतु त्याच्या कुटुंबात हे बोन मॅरो देऊ शकेल असा दाताच नव्हता. विदर्भातील आदिवासी चिमुकल्यांवर मुंबईच्या डॉक्‍टरांनी बोन मॅरो देणारा दाता शोधला. एका चिमुकल्याला पुनर्जन्म मिळाला. दुसऱ्यावर कॅन्सरने घाव घातला. गरीब कुटुंबातील व्यक्तींना अनेक आजारांवर बोन मॅरो उपलब्ध करून देणे शक्‍य नसते. रक्ताचे नाते नसलेला बोन मॅरो दाता शोधणेही कठीण असते. यामुळे प्राथमिक स्तरावर नागपूरच्या मेडिकलमध्ये प्रायोगिक स्तरावर बोन मॅरो रजिस्ट्रीची घोषणा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व संशोधनमंत्री गिरीश महाजन यांनी केली होती. रजिस्ट्री तयार झाल्यानंतर दात्याचे बोन मॅरो रुग्णासाठी उपलब्ध करण्यासाठी प्रत्यक्ष दात्याला काही पैसे द्यावे लागत नाहीत. रक्ताचे नाते नसलेला आणि तरीही बोन मॅरो जुळणारा दाता सापडल्यानतंर मात्र त्याने माघार घेऊ नये, एवढीच सक्ती यात असते. राज्यात बोन मॅरो शोधून देणारी रजिस्ट्री मोफत चालवली जात नाही. यामुळेच "टाटा ट्रस्ट' यांच्या मदतीने बोन मॅरो रजिस्ट्री तयार करण्यात येईल, असे महाजन यांनी मुंबईत ऑगस्ट 2016 रोजी झालेल्या मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार, मेयोच्या तत्कालीन अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी वाहणे यांना सुचविले होते. बोन मॅरो दाता यांचा पांढऱ्या पेशींचा गट (एचएलए टायपिंग- ह्युमन ल्युकोसाइट अँटिजेन) जुळल्यानंतर एचएलए टायपिंगचा खर्च मोठा असतो. हा खर्च टाटा ट्रस्ट उचलणार होता. परंतु अद्याप बोन मॅरोची रजिस्ट्री तयार झाली नाही. 

मंत्रिमहोदयांचा ड्रीम प्रोजेक्‍ट 
बोन मॅरो रजिस्ट्री हा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांचा ड्रीम प्रोजेक्‍ट आहे. नागपूर मेडिकलमध्ये रजिस्ट्री तयार झाल्यानंतर पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि येथे हा प्रयोग केला जाणार असल्याचेही महाजन म्हणाले होते. राज्यातील बीपीएल तसेच गरिबांना गरज पडताच रजिस्ट्रीतून दात्याशी संपर्क साधून बोन मॅरो करणे शक्‍य आहे.

Web Title: bone mero