esakal | सापाला क्रूरपणे ठार मारत व्हिडिओ व्हायरल करणारे ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

सापाला क्रूरपणे ठार मारत व्हिडिओ व्हायरल करणारे ताब्यात

सापाला क्रूरपणे ठार मारत व्हिडिओ व्हायरल करणारे ताब्यात

sakal_logo
By
मिलिंद उमरे

गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील आरमोरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या येंगाडा गावात दोन व्यक्तींनी धामण जातीच्या बिनविषारी सापाला विनाकारण अतिशय क्रूरपणे ठार (killing a snake) मारत व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केला. त्यानंतर या प्रकरणी वनविभागाने दोन आरोपींना ताब्यात घेतले (two people arrested) आहे. नरेश रामजी कुमरे, यशवंत रामाजी कुमोटी (दोघेही रा. येंगाडा) अशी आरोपींची नावे आहेत. (Both-arrested-for-killing-a-snake-in-Gadchiroli)

दोन व्यक्तींनी धामण जातीच्या सापाला पकडून क्रूरपणे ठार करीत समाजमाध्यमांवर व्हिडिओ व्हायरल केला होता. यावर आरमोरी वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेने आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार तसेच प्रतिलिपीद्वारे मुख्य वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, वडसाचे उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल आणि गडचिरोली वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे यांना निवेदन देऊन संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

वनविभागाच्या पथकाने येंगाडा गाव गाठत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये यातील एक आरोपी हाताने धामण सापाची मान व दुसऱ्या हाताने शेपूट धरून बडबडत व शिवीगाळ करताना दिसत आहे. शिवाय ही व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचेही व्हिडिओतून लक्षात येते. त्याची पत्नी व मुलगी त्याला सापाचा छळ करण्यापासून परावृत्त करत असताना त्याने हाताने सापाची मान व दुसऱ्या हाताने सापाची शेपूट धरून जमिनीवर ठेवत लाथेचे चिरडून चिरडून ठार केल्याचे दिसून येते.

हेही वाचा: ‘ट्विट’वार : आम्ही कशाला म्हणणार ‘चंपा’ किंवा ‘टरबुज्या’

ताब्यात घेतलेल्या आरोपींना विचारणा केल्याने घरात साप आला तेव्हा लहान बाळ झोपले होते. त्यामुळे या सापाला ठार करावे लागले. व्हिडिओ चित्रीकरण करण्यापूर्वीच साप मेला होता, असे सांगितल्याचे वनविभागाने कळविले आहे. एकीकडे वन्यजीव, प्राणीरक्षक प्राण्यांना वाचविण्यासाठी गावागावात कार्यक्रम घेऊन जनजागृती करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असताना अशा क्रूर पद्धतीने सापांना ठार करून समाजमाध्यमांवर मिरवणाऱ्या आरोपींवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी आरमोरी येथील वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली.

वनगुन्हा दाखल होऊन कारावासाची शिक्षा

या प्रकरणात वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्थेची भूमिका महत्त्वाची ठरली. संस्थेने समाजमाध्यमांवर व्हायरल झालेला व्हिडिओ दिसताच वनविभागाकडे पाठपुरावा केल्यामुळे आरोपींना ताब्यात घेण्यात आले. साप भारतीय वन्यजीव कायदा १९७२ अंतर्गत संरक्षित असून त्यांना पकडणे, बंदिस्त करून ठेवणे, छळ करणे, अवैध वाहतूक किंवा ठार करणे यासाठी वनगुन्हा दाखल होऊन कारावासाची शिक्षा होते. त्यामुळे साप दिसल्यास प्रशिक्षित सर्पमित्रांना पाचारण करायला हवे किंवा वनविभागाला माहिती द्यायला हवी.

(Both-arrested-for-killing-a-snake-in-Gadchiroli)

loading image