गणेश विसर्जनानंतर मित्रांसोबत धरणात गेला पोहायला.. अन तिथेच काळाने केला घात 

boy in amaravti is no more due to drowning in dam
boy in amaravti is no more due to drowning in dam
Updated on

अमरावती :  नदीपात्रात गणपती मूर्तीचे विसर्जन करून दुसऱ्या धरणाचे ठिकाणी मित्रांसोबत पोहायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. आज सायंकाळी पाच च्या सुमारास ही घटना घडली.  देवेंद्र अशोक बुंदेले (वय 22 वर्षे, रा. श्रीरामनगर, अमरावती. ) असे मृत युवकाचे नाव आहे.  

देवेंद्र हा पॉलीटेकनिक चा विद्यार्थी होता.  देवेंद्र दुपारी तीन च्या सुमारास घरगुती गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी आपल्या चार मित्रांसोबत रेवसा येथील नदी पात्रता गेला होता.  विसर्जन करून पाचही जण घराकडे परत न जाता,  फिरण्यासाठी नांदगावपेठ हद्दीत वाळकीं गावाजवळच्या नव्याने सुरु असलेल्या धरण पात्रात गेले.  

येथे  विसर्जन करण्याची अनुमती नव्हती.  देवेंद्र सह त्याचे पाचही मित्र पोहण्यासाठी धरण पात्रता उतरले. त्यापैकी कुणालाही पोहता येत नव्हते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने,  त्यापैकी देवेंद्र बुंदेले याचा बुडून मृत्यू झाला.  घाबरलेल्या उर्वरित चारही मित्रानी घाबरून नांदगावपेठ पोलीस स्टेशन ला घटनेची माहिती दिली.  

पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शोध व बचाव  पथकाच्या पथकाला वाळकीं धरण परिसरात पाचारण केले.  अंधारात या पथकाने देवेंद्र चा मृतदेह बाहेर काढला.  नांदगावपेठ पोलिसांनी आकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली. देवेंद्र चे वडील अशोक  बुंदेले हे आयुक्तालयातील शहर कोतवाली ठाण्यात कार्यरत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com