
आकाश गजानन पवार (वय 19) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव असल्याचे पोलिस निरीक्षक पंजाब वंजारी यांनी सांगितले. आकाशविरुद्ध पीडित युवतीच्या तक्रारीवरून विनयभंग, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बडनेरा ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
अमरावती ः बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करून रस्त्यात अडविले. त्यानंतर तुला तर, घेऊनच जाईल. अशी धमकी युवकाने दिली. न्यायालयाने त्या युवकाची कारागृहात रवानगी केली.
आकाश गजानन पवार (वय 19) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव असल्याचे पोलिस निरीक्षक पंजाब वंजारी यांनी सांगितले. आकाशविरुद्ध पीडित युवतीच्या तक्रारीवरून विनयभंग, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बडनेरा ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
हेही वाचा - काय सांगता! आज रविवार आहे, अंत्यसंस्कार विधी होणार नाही! ही आहे अडचण
2018 मध्येही आकाश पीडितेचा पाठलाग करून तिचा छळ करीत होता. त्यामुळे दोन वर्षांपूर्वीही आकाशविरुद्ध बडनेरा ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल होता. ते प्रकरण सद्य:स्थितीत न्यायप्रविष्ट आहे. तिच्या नकारानंतरही ती एक दिवस आपलीच होईल, अशी इच्छा तो मनी बाळगून होता.
नोव्हेंबर 2020 मध्ये अल्पवयीन युवती सार्वजनिक नळावर पाणी भरत असताना, आकाशने तिला गाठले. रस्त्यावरच तिच्यासोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न त्याने केला. आरडाओरड केल्याने पीडितेचे वडील तेथे पोचले. त्यांनी आकाशच्या तावडीतून मुलीला सोडविले. परंतु तेथून निघून जाण्यापूर्वी आकाशने अल्पवयीन मुलीला तिच्या पालकांसमोरच तुला तर, एक दिवस घेऊनच जाईल. अशी धमकी दिली. मागच्या गुन्ह्यातही काही झाले नाही, पिडीतेच्या पित्याने हटकले असता, त्यांनाही आकाशने जीवाने मारण्याची धमकी दिली.
आकाशविरुद्ध विनयभंगाचा हा दुसरा गुन्हा आहे. तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने अटक केली. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
- पंजाब वंजारी,
पोलिस निरीक्षक, बडनेरा ठाणे.
संपादन - अथर्व महांकाळ