हृदयद्रावक! तो नेहमीप्रमाणे मार्निंग वॉकला निघाला..पण वाटेतच झाला भयंकर स्फोट..पुढे घडली धक्कादायक घटना..        

boy is no more due to short circuit and blast in transformer
boy is no more due to short circuit and blast in transformer

अर्जुनी(जि. गोंदिया) : आपल्या जीवनात पुढच्या काही मिनिटांमध्ये काय होईल याची शाश्वती कोणालाच देता येत नाही. जीवन जगात असताना आपल्यासोबत अशा काही घटना घडतात ज्यांची आपण कधी कल्पनाही केली नसते. अशीच एक धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. 

खोडशिवनी रेल्वेस्थानकापासून 200 मीटर अंतरावर रेल्वेच्या हायपर टेंशन लाइनचा ओहरहेड वायर पावसामुळे शॉर्टसर्किट झाला. यावेळी वायर तुटून रुळावर पडले आणि मॉर्निंग वॉककरिता गेलेल्या तीन मुलांना शॉक बसला. यात एका मुलाचा जागीच मृत्यू झाला. एकजण गंभीर जखमी झाला असून, त्याला नागपूरला हलविण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (ता. 11) सकाळी सातच्या सुमारास घडली. यावेळी मोठा स्फोट झाल्याचेही प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.

मॉर्निंग वॉककरता निघाले 

करण जयेंद्र राऊत (वय 17, रा. खोडशिवनी) असे मृताचे नाव आहे. नीरज देवानंद राऊत (वय 18) हा गंभीर जखमी असून, नयन विनायक राऊत (वय 19) हा किरकोळ जखमी झाला आहे. करण, नीरज व नयन ही स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी मुले नेहमीप्रमाणे आज, मंगळवारी सकाळी मॉर्निंग वॉककरिता खोडशिवनी रेल्वेस्थानक रोडकडे गेले होते. परत येत असताना वाटेत रेल्वेलाइनच्या कडेला उभे होते.

नक्की काय घडले 

दरम्यान, सकाळी सातच्या सुमारास अचानक तिथेच रेल्वेच्या ओहरहेड लाइनमध्ये बिघाड होऊन मोठा आवाज झाला. विद्युत तारेने अचानक पेट घेतला. यात रेल्वे खांबाच्या उंच बाजूला उभा असलेला करण खाली ओढला गेला. त्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. तसेच त्याच्या बाजूला उभा असलेल्या नीरज राऊत हा शॉक लागून भाजला गेला. त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून, पुढील उपचाराकरिता त्याला नागपूरला हलविण्यात आले आहे. नयन राऊत हा बाहेर फेकला गेल्याने किरकोळ जखमी झाला. घटनेनंतर मोठा स्फोट होऊन विद्युत तार पाच मिनीटांपर्यंत जळत होती, असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून लाइन बंद केली. ताबडतोब दुरुस्तीची कामे हाती घेतली. स्पर्धा परीक्षेची तयारी करून भावी आयुष्याचे स्वप्न पाहणाऱ्या करणवर काळाने झडप घातल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस पाटील भृंगराज परशुरामकर यांच्या तक्रारीवरून डुग्गीपार पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

आमदार चंद्रिकापुरेंची घटनास्थळाला भेट

या घटनेची माहिती मिळताच आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्यासह गंगाधर परशुरामकर, रमेश चुऱ्हे यांनी घटनास्थळाला भेट दिली. मृत करणच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. 

संपादन - अथर्व महांकाळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com