चिखलदरा: प्राध्यापिकेनेच केले विद्यार्थ्याचे लैंगिक शोषण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

महाविद्यालयाच्या परिसरताच होत असलेला हा सर्व प्रकार असाह्य झाल्याने या विद्यार्थ्याने संपूर्ण प्रकरणाची रितसर तक्रार चिखलदरा पोलिसांत नोदविली. तक्रार झाल्याचे माहित पडताच या प्राध्यापिकेने पळून जाण्याचा प्रयत्न केला.

अमरावती : जिल्ह्यातील चिखलदरा येथील प्रख्यात निवासी सैनिक शाळा व महाविद्यालयात एका 11 वीत शिक्षण घेत असलेल्या मुलाचे येथील प्राध्यापिकेनेच लैंगिक शोषण चलविल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

महाविद्यालयाच्या परिसरताच होत असलेला हा सर्व प्रकार असाह्य झाल्याने या विद्यार्थ्याने संपूर्ण प्रकरणाची रितसर तक्रार चिखलदरा पोलिसांत नोदविली. तक्रार झाल्याचे माहित पडताच या प्राध्यापिकेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी तिला अटक केली असुन तिच्यावर पॉस्को अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आले आहे.

या सर्व प्रकाराने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमुळे सुद्धा शाळेत सुरक्षित नाही अशी एकूण चर्चा सुरु आहे. 

Web Title: boy sexual harassment in Amravati