विश्वास बसेल का? 'रोहित पवार'ने चोरला टीव्ही

बादल वाणकर
Sunday, 30 August 2020

पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेत आरोपी रोहित पवार (रा. खंडाळा) आणि कपिल सुरेश कंगाले (रा. समुद्रपूर) या दोघांना अटक केली. शिवाय त्यांचायकडून लंपास केलेली दुचाकी आणि टीव्ही जप्त केली आहे. ही कारवाई ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी उमेश हरणखेडे, जितेंद्र वैद्य, श्री. कोसूरकर, श्री. जाधव यांनी केली.

समुद्रपूर (जि. वर्धा) : घरातील टीव्ही चोरी गेल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात दिली. तक्रारीवरून पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला व दोन आरोपींना अटक केली. परंतु, टीव्ही चोरी करणारा तक्रारदार महिलेचाच मुलगा निघाल्याने चांगलाच धक्का बसला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या शेतीचा हंगाम असल्याने शेतीकामासाठी सोईचे व्हावे यासाठी बरेच शेतकरी शेतातच मुक्काम करतात. खंडाळा येथील कमला पवार यांनीही शेतात वास्तव्य केले. घरी कोणीच नसल्याचा फायदा घेत मुलाने मित्रासह घरचा टीव्ही चोरला. याच काळात शेजारी राहणाऱ्या हिरामण पवार यांची दुचाकी क्रमांक एमएच ३२ व्ही ३५५३ घेऊन दोघेही चोरटे पसार झाले.

अधिक वाचा - हे उपाय करा आणि कायमचे घालवा चेहऱ्यावरील वांग.. जाणून घ्या महत्वाची माहिती

कमला पवार आणि हिरामण पवार यांना घटनेची माहिती होताच त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेत आरोपी रोहित पवार (रा. खंडाळा) आणि कपिल सुरेश कंगाले (रा. समुद्रपूर) या दोघांना अटक केली. शिवाय त्यांचायकडून लंपास केलेली दुचाकी आणि टीव्ही जप्त केली आहे. ही कारवाई ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस कर्मचारी उमेश हरणखेडे, जितेंद्र वैद्य, श्री. कोसूरकर, श्री. जाधव यांनी केली.

आईला बसला धक्का

कमला पवार यांना टीव्ही कुणी चोरली यांची माहिती नसल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असता मुलगाच चोर निघाल्याची माहिती तक्रारदार महिलेला मिळाली. याचा तिला चांगलाच धक्का बसला.

वाचा - सावधान! सर्वात मोठ्या धरणाचे 33 दरवाजे उघडले.. इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग; जिल्ह्यात पुराचा धोका वाढला

दारूच्या व्यसनापोटी चोरली टीव्ही

घरातून टीव्ही चोरणारा रोहित पवार हा वडिलांपासून वेगळा राहतो. त्याला दारूचे व्यसन असल्याने त्याने घरी कोणी नसल्याची संधी साधत मित्राच्या साहायातून टीव्ही चोरल्याची कबुली पोलिसांना दिली.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The boy stole the home TV in Wardha district