चिखलदऱ्यात होणार ब्रह्मसती डॅम

file photo
file photo

अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी चिखलदरा येथील ब्रह्मसती डॅमच्या मान्यतेसाठी दिल्ली येथील पर्यावरण मंत्रालयात केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. दरम्यान, झालेल्या चर्चेत केंद्रीय मंत्र्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे चिखलदऱ्यात ब्रह्मसती डॅम होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
भेटीदरम्यान अमरावती जिल्ह्यातील विकासकामांसंदर्भात विशेषत: चिखलदऱ्याच्या ब्रह्मसती डॅमला मान्यता देण्यासंदर्भात 1 तास चर्चा झाली. या वेळी प्रकाश जावडेकर यांनी तत्काळ ब्रह्मसती डॅमसंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. चिखलदरा येथे ब्रह्मसती डॅम झाल्यास पाण्यासाठी आसुसलेल्या मेळघाट, धारणी, चिखलदरा व अचलपूर येथील जनतेला मुबलक पाणी मिळेल. संपूर्ण मेळघाटातील घराघरांपर्यंत पाणी पोहोचेल, असे खासदार नवनीत राणा यांनी सांगितले. शिवाय डॅममुळे चिखलदऱ्याच्या पर्यटनस्थळाला विशेष चालना मिळवून चिखलदरा हे महाराष्ट्रातील माथेरान, महाबळेश्‍वर, लोणावळाच्या धर्तीवर मोठे पर्यटनस्थळ बनणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार नवनीत राणा यांच्या या प्रयत्नाला यश मिळाले आहे. खासदारकीमध्ये त्यांचे हे विकासाचे मोठे पाऊल असल्याचे बोलले जात आहे. या वेळी प्रामुख्याने आमदार रवी राणा व पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com