ईव्हीएमवर ब्रेल लिपीची सुविधा 

file photo
file photo

नवेगावबांध (गोंदिया ) : सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीकरिता यंदा प्रथमच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत मतदारांना मतदार पावतीबरोबरच मतदारांसाठी सचित्र माहिती पुस्तिकेचे वाटप घरोघरी जाऊन मतदारांना वितरित करण्यात आल्या. यंदा प्रथमच ईव्हीएम यंत्रावर अंध, दिव्यांग मतदारांसाठी ब्रेल लिपीची सुविधा देण्यात आली आहे. सामान्य, अशिक्षित, नवमतदारांचा तसेच दिव्यांग मतदारांचा मतदानासाठी मतदान केंद्रावर गेल्यानंतर गोंधळ उडणार नाही, याची पुरेपूर दक्षता निवडणूक आयोगाने घेतली आहे. 
मतदार माहितीपुस्तिकाद्वारे मतदार जागृती स्विप कार्यक्रमांतर्गत पद्धतशीरपणे मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागाची जागृती निवडणूक आयोगामार्फत केल्या जात आहे. यासाठी या सचित्र माहिती पुस्तिकेचे वितरण आयोगामार्फत केल्या जात आहे. या माहिती पुस्तिकेत मतदार यादीत नाव कसे व कोण नोंदवू शकते, यापासून तर मतदान केंद्रात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, अंध तथा दुर्बल मतदारांना मतदानाच्या दिवशी कोणकोणत्या सुविधा मतदान केंद्रावर देण्यात येणार आहे. याची इत्यंभूत माहिती या सचित्र माहिती पुस्तिकेत देण्यात आले आहे. मतदार छायाचित्र ओळखपत्र, आपले बहुमूल्य मत कसे नोंदवाल, मतदान केंद्राची रचना, निवडणूक अधिकारी पहिला, दुसरा, तिसरा यांच्याकडे मतदारांनी कसे जायचे, मतदान केंद्रात प्रवेश कसा करावा, मतदान यंत्र ईव्हीएम व व्हीव्हीपॅटच्या साहाय्याने मतदान कसे करावे, मतदार यादी कशी पाहावी, जर मतदार ओळखपत्र नसेल तर अकरा दस्तावेजातील कोणता पुरावा चालेल याची यादी, रॅप, व्हीलचेअर, स्वयंसेवक याची मोफत सुविधा, प्रथमोपचार, पिण्याचे पाणी, शौचालय व्यवस्था, मतदान पावती, आधी सुविधांची माहिती या पुस्तिकेत दिली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच राज्यातील अंध (दिव्यांग) मतदारांना मतदानाचा हक्क प्रत्यक्ष बजावता यावा, यासाठी ईव्हीएम मतदान यंत्रावर ब्रेल लिपीची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. विशिष्ट ठिकाणी खास महिलांसाठी फक्त महिला संचालित मतदान केंद्राची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. मतदारांसाठी उपयुक्त सचित्र माहिती या मतदार माहिती पुस्तिकेत देण्यात आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या स्मार्ट कारभाराबद्दल मतदारांत मतदानाची उत्सुकता वाढली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com