मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाचे 'ब्रेक' फेल

break fail of the vehicle from CM fleet of vehicle
break fail of the vehicle from CM fleet of vehicle

यवतमाळ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाजनादेश यात्रेनिमित्त सोमवारी (ता. 5) जिल्ह्यात आगमन झाले. त्यांचा ताफा वडकीवरून राळेगावला जात असताना वाढोणा (बाजार) येथील बसस्थानकानजीक ताफ्यातील ’एटीएस’ अधिकार्‍यांच्या वाहनाचे ’ब्रेक’ फेल झाले. वाहकाने समयसूचका दाखवून वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या मुरुमाच्या ढिगार्‍यावर चढविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचाही प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.  

सुरक्षा यंत्रणेकडून मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जाते. [ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा] त्यांच्या ताफ्यात चांगल्या कंडिशनचेच वाहने सामील करून घेतली जातात. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे वाहन (क्रमांक : एम. एच. 29, एम. 9558) सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात दाखल करण्यात आले होते. या वाहनात मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेची महत्त्वाची जबाबदारी असलेले जिल्ह्यातील ’अ‍ॅन्टी टेरिरिझ्म स्कॉड’चे चार पोलिस अधिकारी व कर्मचारी बसले होते. मुख्यमंत्र्यांचा ताफा वाढोणा (बाजार) मार्गे राळेगावला जात असताना मुख्यमंत्र्यांना अभिवादन करण्यासाठी वाढोणा (बाजार) बसस्थानकाजवळ हजारो लोकांनी गर्दी केली होती. ताफा पुढे सरकत असताना ताफ्यातील सातव्या आठव्या क्रमांकाचे वाहन ‘ब्रेक’ फेल झाल्याने अनियंत्रित झाले. ताफ्यातील दुसर्‍या वाहनाला टक्कर होऊ नये व रस्त्याच्या कडेला असलेल्या लोकांच्या अंगावरून अनियंत्रित झालेले वाहन जाऊ नये, म्हणून चालकाने प्रसंगावधान राखून रस्त्याच्या बाजूला असलेल्या मुरूमाच्या ढिगावर वाहन चढविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

वाहन अनियंत्रित झाल्याचे पाहून लोकांची गर्दीदेखील सैरभैर झाली होती. ताफ्यामध्ये अशा प्रकारचे नादुरुस्त वाहन सामील करून घेतल्याबदल्ल स्थानिक लोकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर लोकांनी वाहनाला धक्का मारून ते रोडवर आणले. त्यानंतर सदर वाहनातील अधिकार्‍यांना स्पेअर कारमध्ये बसविण्यात आले. मुख्यमंत्र्यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या ताफ्यात अशा प्रकारचे नादुरुस्त वाहन सामील करून घेतल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. 

’सदर वाहन पशुसंवर्धन विभागात 2011 मध्ये आले आहे. गेल्या तीन वर्षांत या वाहनाची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे वाहनाचे ‘ब्रेक’ फेल झाले. वाहन मुरूमाच्या ढिगार्‍यावर चढवून रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या लोकांचे जीव वाचवावे लागले. या वाहनात ’एटीएस’चे महत्त्वाचे अधिकारी व कर्मचारी होते. त्यांना दुसर्‍या वाहनात बसून पुढील प्रवास करावा लागला.’ 
- नंदकिशोर गोजुलवार, चालक, पशुसंवर्धन विभाग, यवतमाळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com