लाचखोर आरटीओ दलालास अटक

file photo
file photo

नागपूर  : शहर आरटीओ कार्यालयात दुचाकीच्या कागदपत्राची दुय्यम प्रत घेण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीकडून तीन हजारांची लाच घेताना एका दलालाला "एसीबी'ने अटक केली. विजय विश्वनाथ हुमने (50) असे अटकेतील लाचखोर दलालाचे नाव आहे. तर त्याला लाच घेण्यासाठी सांगणारा शहर आरटीओ कार्यालयातील कर्मचारी एसीबीच्या कारवाईनंतर फरार झाल्याची माहिती आहे.
तक्रारदार हे भानखेडा टिमकी, दादरापुलाजवळ राहतात. ते मनपात कार्यरत असून त्यांच्या दुचाकीचे (दुचाकी क्र. एमएच-31/सीवाय/50- डीओ मोपेड) कागदपत्र हरविले होते. त्यामुळे त्यांना वाहनाच्या कागदपत्राची दुय्यम प्रत हवी होती. याकरिता ते शहर आरटीओ कार्यालयात गेले असता येथील कर्मचाऱ्याने त्यांना फॉर्म व इतर कागदपत्रांची माहिती देत बाहेर बसलेला दलाल विजय विश्वनाथ हुमनेला भेटण्यास सांगितले. आरटीओ कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून ते हुमने यांना भेटले असता साध्या दुय्यम प्रतीकरिता त्याने 3 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. ही लाच रक्कम पोलिस रिपोर्ट, आरटीओ कर्मचारी व स्वत:करिता लागणार असल्याचे सांगितले. मात्र, ही रक्‍कम कामापेक्षा जास्त होत असल्याने, त्यात तक्रारदारास लाच द्यायची नसल्याने त्यांनी याविषयी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार केली. त्यानुसार, पंचासमक्ष मागणी केल्याचे सिद्ध झाल्यानंतर लगेच सापळा कारवाई करण्यात आली. यावेळी हुमने 3 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडल्या गेला. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. आरोपीचा मोबाईल सीडीआर काढण्यासह तक्रारदाराच्या तक्रारीनुसार आरटीओतील त्या कर्मचाऱ्यावरही एसीबीकडून कारवाई केली जाणार असल्याचे सांगितल्या जाते. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुनील बोंडे, नायक पोलिस शिपाई रविकांत डहाट, पोलिस शिपाई मंगेश कळंबे, महिला नायक पोलिस शिपाई अस्मिता मेश्राम, मंजूषा बुंधाळे, हवालदार वकील शेख यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com