नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 1 लाख 10 हजारांचा गंडा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

खामगाव तालुक्यातील जनुना येथील अंबादास रामभाऊ शेजव (वय 27) यास अजयसिंह प्रतापसिंह राजपूत यांनी व प्रतापसिंह राजपूत यांनी संगनमत करून फीस समाज कल्याण खात्यात नौकरी लावून देण्याचे आमिष दाखविले.

खामगाव : समाज कल्याण विभागात नोकरी लावून देतो असे आमीष दाखवून बेरोजगार युवकाची 1 लाख 10 हजार रुपयाने गंडा लावून फसवणूक केल्या प्रकरणी पोलिसांनी 2 जणांवर आज गुन्हा दाखल केला आहे.

खामगाव तालुक्यातील जनुना येथील अंबादास रामभाऊ शेजव (वय 27) यास अजयसिंह प्रतापसिंह राजपूत यांनी व प्रतापसिंह राजपूत यांनी संगनमत करून फीस समाज कल्याण खात्यात नौकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. त्याचा कडून 1 लाख 10 हजार रुपये घेऊन कोणत्या ही प्रकारची नौकरी न लावून देता फसवणूक केली. तशी तक्रार अंबादास शेजव यांनी पोलीसात दिल्यावर राजपूत पिता पुत्रावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: bribery case in Akola