'लाच’ प्रकरण भोवले; आता वेतनवाढीचे वांदे!

telhara talathi.jpg
telhara talathi.jpg

हिवरखेड (जि. अकोला) ;  येथील दोन्ही तलाठींवर लाच घेतल्याचा आरोप होता. याप्रकरणी तहसीलदारांनी दोंन्ही तलाठींना कारणे दाखवा नोटीस बजावत लेखी स्पष्टीकरण मागविले होते. लेखी स्पष्टीकरण संयुक्तिक वाटत नसल्याने तहसीलदार सुरडकार यांनी दोंन्ही तलाठ्यांची कायम प्रभावाने एक वेतनवाढ रोखण्याचा कार्यालयीन आदेश काढला असून, बदलीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे.


हे वाचा - राज्य सरकारच्या बदलत्या धोरणाचा असाही परिणाम
दाखल्याच्या बदल्यात घेत होते पैसे

काही दिवसांपूर्वी येथील प्रहारच्या कार्यकर्त्यांनी रवी घुंगड यांच्या नेतृत्वात येथील भाग एकचे तलाठी पी. एम. वाकपांजर आणि भाग दोनचे तलाठी एम. एन. अढाऊ यांच्या कार्यालयात शासनामार्फत मोफत असलेल्या दाखल्यांचे नागरिकांकडून पैसे वसूल करून लाच घेत असल्याचा आरोप करीत झालेल्या विवादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित केले होते. या दोन तलाठ्यावर लाचखोरीचा आरोप करून त्यांच्यावर कारवाईची मागणी लावून धरली होती. त्यानंतर याप्रकरणी मंडळ अधिकारी वडाळ यांनी अनेक नागरिकांचे लेखी बयान घेतले होते. या बयाणांमध्ये विसंगती दिसत आहे.


क्लिक करा - छत्रपती शिवरायांच्या पालखीच्या भोई झाल्या ‘सावित्रीच्या लेकी’! 
बदलीचाही प्रस्ताव पाठविण्यात आला

काही नागरिकांनी हे तलाठी पैसे घेत असल्याचे बयान दिले तर काहींनी तलाठ्यांनी पैसे घेतले नसल्याचे बयान दिले आहे. नंतर तहसीलदारांनी दोन्ही तलाठ्यांना कारणे दाखवा नोटीस देत दोन दिवसात लेखी स्पष्टीकरण मागितले होते. या दोंन्ही तलाठ्यांनी दिलेले लेखी स्पष्टीकरण संयुक्तिक वाटत नसल्याने महाराष्ट्र सेवा वर्तणूक नियम उल्लंघन केल्याचे तहसीलदारांना दिसून आले. त्यामुळे तेल्हारा तहसीलदार सुरडकर यांनी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियमानुसार, पुढील वेतन वाढीवर परिणाम न होता दोंन्ही तलाठ्यांची कायम प्रभावाने एक वेतनवाढ रोखण्याचा कार्यालयीन आदेश काढला. एवढेच नव्हे तर ह्या तलाठ्यांचे बदलीचा प्रस्ताव आकोटचे उपविभागीय अधिकारी रामदास सिद्धभट्टी यांच्याकडे पाठविला आहे.
 
डिमोशन ऐवजी प्रमोशन?
यापैकी एक तलाठी अढाऊ यांचे मंडळ अधिकारी पदावर प्रमोशन झाल्याची चर्चा पसरली. याबाबत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांना विचारले असता त्यांच्या बढतीचे आदेश सदर विवाद आणि तक्रारीपूर्वीच झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे याप्रकरणी गावात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. जनतेकडून पैसे घेण्याचा आरोप असलेल्या तलाठ्याला बढती मिळत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी दोंन्ही तलाठ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी फोनवर संपर्क होऊ शकला नाही.

नागरिकांना प्रचंड हेलपाटे
या घटनेनंतर सहा फेब्रुवारीपासून नागरिकांना आवश्यक दाखल्यांसाठी व शासकीय कामासाठी प्रचंड हेलपाटे होत असून, हिवरखेड आणि आजूबाजूच्या गावाकरिता कोणकोणत्या तलाठ्याकडे प्रभार आहेत? किंवा कोणते नवीन तलाठी नियुक्त केले आहेत? याबाबत जनतेमध्ये संभ्रम असून विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे अनेक कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शासनाने त्वरित कर्तव्यतत्पर तलाठ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी हिवरखेड आणि परिसरातील नागरिक करीत आहेत.

लवकरच नवीन तलाठ्यांची नियुक्ती होणार
दोन्ही तलाठ्यांची एक वेतनवाढ रोखली असून, त्यांच्या बदलीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी लवकरच हिवरखेड येथे कर्तव्यतत्पर तलाठी नियुक्त करू.
-राजेश सुरडकार, तहसीलदार, तेल्हारा

पदोन्नती प्रकरण पालमंत्र्यांच्या दरबारी जाणार
ज्या तलाठ्याचे पदोन्नती व्हायला पाहिजे त्यांची पदोन्नती होत आहे. हा गंभीर प्रकार पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून, त्या तलाठ्यांची पदोन्नती रद्द करण्याची विनंती करू.
-रवी घुंगड 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com