छत्रपती शिवरायांच्या पालखीच्या भोई झाल्या ‘सावित्रीच्या लेकी’!

महादेव घुगे
Thursday, 20 February 2020

रिसोड (जि.वाशीम) : शिवजयंती निमित्त 19 फेब्रुवारी रोजी प्रथमच महिलांच्या न भूतो न भविष्यती अशा रॅलीचे आज आयोजन करण्यात आले होते. सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीचे उद्‍घाटन रिसोडच्या नगराध्यक्ष विजय माला आसनकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यापूर्वी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
 

रिसोड (जि.वाशीम) : शिवजयंती निमित्त 19 फेब्रुवारी रोजी प्रथमच महिलांच्या न भूतो न भविष्यती अशा रॅलीचे आज आयोजन करण्यात आले होते. सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीचे उद्‍घाटन रिसोडच्या नगराध्यक्ष विजय माला आसनकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यापूर्वी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 
 
रॅली नवीन सराफ लाइन, चांदणी चौक, जुनी सराफ लाइन, पंचवाट मार्ग, अष्टभुजा देवी चौक, जामा मस्जिद चौक,आसनगल्ली मार्गाने होत परत छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचत रैलीचे समापन करण्यात आले. रॅलीमध्ये महिलांनी नऊवारी साडी, भगवा रंगाचा फेटा,कपाळावर शिवतेज यामुळे रॅलीत महिलांनी देखणा स्वरूप आले होते. रॅली दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय घोषणांनी शहर अक्षरशः दुमदुमलू होते. यादरम्यान फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. 

महत्त्वाची बातमी - आणखी तीन दिवस बँका बंद; जाणून घ्या कारण

महिला भजनी मंडळांचा सहभाग
छत्रपती शिवाजी महाराज व मॉ जिजाऊ यांचे वेशभूषा करत घोडस्वार चिमुकल्यांनी चांगलेच लक्ष वेधले होते. डीजेच्या तालावर नृत्य सादर करत महिलांनी शिवजयंतीचा आनंद साजरा केला. यादरम्यान महिला भजनी मंडळांनी छत्रपती शिवाजी महाराज वर भजन म्हणत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रॅली दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणेदार अनील ठाकरे यांच्या नेतृत्वाला पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. या बंदोबस्तात महिला कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग करण्यात आला होता.

क्लिक करा - ...त्याने चक्क पोलिसांच्या समोर आरोपीला दिली गांजाची पुडी

अंबा फाऊंडेशनच्या पुढाकाराने महिला एकवटल्या
मागील काही काळात महिलांवर वाढत चाललेले अत्ताचार.पिसाळलेली मानुष्कीमुळे तु आहे तुझ्या शिलाची रक्षक या ब्रिद वाक्यनुसार अंबा फाऊंडेशन बिबखेडा संस्थापक अध्यक्षा सोनल श्रीराव यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज जयंती साठी महिलांना छत्रपती शिवरायांच्या पालखीचे भोई बनविण्या साठी पुढाकार घेत महिलांचा आत्मविश्वास जागृत केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shivjayanti in risod