राज्य सरकारच्‍या बदलत्‍या धोरणांचा असाही परिणाम

pocra.jpg
pocra.jpg

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : राज्‍य सरकारच्‍या बदलत्‍या धोरणामुळे खारपाण पट्टयातील शेतकऱ्यांसाठी आशावादी असणारी पोक्रा योजना पोकळ झाली आहे. यामध्ये गावनिहाय लक्षांक ठेवण्यात आल्‍याने शेतकऱ्यांच्‍या आर्थिक उन्नतीचे स्‍वप्‍न भंग पावणार असेच चित्र दिसत आहे. लक्षांकामुळे ड्रॉ पध्दतनुसार लाभार्थी निवड करण्याची वेळ तालुका कृषी विभागावर आली आहे. शेकडो शेतकऱ्यांनी विविध लाभासाठी ऑनलाइन अर्ज केलेले आहेत. त्‍यांना पुर्वसंमतीची व ज्‍यांना अगोदर पूर्व संमती मिळाल्‍या अशांनी साहित्‍य खरेदी केल्‍याने पैशाची प्रतीक्षा लागून आहे. एकंदरीत नव्‍या सरकारने या योजनेत हस्‍तक्षेप करुन लक्षांकच्‍या माध्यमातून निधी कपातवर भर दिल्‍याचे दिसत आहे.

अगोदरचच्‍या राज्‍य शासनाने खानपाण पट्ट्यासाठी नानाजी कृषी संजीवनी प्रकल्‍पाच्‍या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नतीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न म्‍हणून पोक्रा योजना अमलात आणली. त्‍यामध्ये ज्‍या गावांची निवड करण्यात आली. अशा गावातील शेतकऱ्यांना योजनेतील नियमानुसार लाभ देण्याची तरतूद ऑनलाइन करण्यात आली होती. त्‍यामुळे एकावेळी एक शेतकरी कितीही साहित्‍य अथवा लाभ घेण्यास पात्र होता. परंतु नवीन राज्‍याशासनाने त्‍यात बंधने घालुन योजनेला पोकळ केले. असा आरोप शेतकरी वर्गातून केला जात आहे. 

गावनिहाय लक्षांक देऊन 2024 पर्यंत नियोजन
अगोदर ज्‍या शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी रजिस्‍ट्रेशन केलेले आहे. त्‍यांना सद्यस्‍थितीत शासनाकडून स्‍टॉप करण्यात आले आहे. तर काही बाबींच्‍या पुर्वसंमती तालुकास्‍तरावरुन देण्याचे अधिकारी तालुका स्‍तरावरुन देण्याचे अधिकार तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. मात्र, लाभ देतांना गावनिहाय लक्षांक देऊन 2024 पर्यंत नियोजन देण्यात आले आहे. या लक्षांकामुळे या योजनेचा बोजवारा वाजविला गेला असल्‍याचे दिसत आहे. संग्रामपूर तालुक्‍यात मिळालेल्‍या लक्षांक मधील घटकांचा विचार केला असता गावातील संख्या व लाभार्थी शेतकरी याचा ताळमेळ लागणे कठीणच म्‍हणावे लागेल. 

पण लक्षांक दिले नाही
वैयक्‍तीक शेततळे 39 गावांसाठी 1397, विद्युतपंत संच 39 गावांसाठी 558 युनिट, तुषार संच 1046, फळबाग लागवड 61 गावांसाठी 467 हेक्‍टर, वृक्ष लागवड 63गावांमध्ये 735 हेक्‍टर सुधारणा, 63 गावात 57 युनिट, सेंद्रीय निविष्ठा उत्‍पादीत करणे 63 गावांमध्ये 58 युनिट, सामूहिक शेततळे अस्‍तरीकरण अधिक विना अस्‍तरीकरण पाच तालुके मिळून 279 गावात 16, वैयक्‍तीक शेततळे अस्‍तरीकरणासह 63 गावात 62 शेततळे, वैयक्‍तीक शेततळे विना अस्‍तरीकरण 63 गावात 77 शेततळे, शेततळे अस्‍तरीकरण 63 गावात 17 शेततळे, नवीन विहीर 63 गावात 104, विहीर पुर्नभरण 63 गावात 306 विहीरी, कृषी यांत्रिकीकरणामध्ये ट्रॅक्‍टरचा उल्‍लेख आहे. पण लक्षांक दिले नाही. यामध्ये ज्‍या गावाची जमीन दोनशे हेक्‍टर आहे. अशा गावात एक ट्रॅक्‍टर बीबीएफ यंत्रासह देण्याची अट नमूद आहे. 

पाच वर्षाच्‍या नियोजनाचे तालुकास्‍तरावर
कृषी यांत्रिकीरणाचेही तसेच आहे. वृंद सरी वरंबा यंत्र, पेरणी यंत्र 63 गावात 123, वृंद सरी वरंबा तंत्रज्ञान 63 गावात 3104 हेक्‍टर, ईलेक्‍ट्रीक मोटरपंप संच 63 गावात 1575 हेक्‍टर तुषार संच खारपाण गावे वगळता 25 गावात 750 संच पाईप, 63 गावात 567 युनिट, बिजोत्‍पादन पाच तालुके मिळून 279 गावात 3629 हेक्‍टर, रेशीम शेती ॲडजेस्‍टमेंटनुसार 63 गावात, कुकुट्टपालन 63 गावात 35 युनिट, पॉली हाऊस, शेडनेट, पॉलीटनेल मधील लागवड पाच तालुके मिळून 279, 25 युनिट पॉली हाऊस उभारणी 63 गाव मिळून 3 युनिट, पॉलीटनेल 63 गावे, 23 युनिट गोड्यापाण्यातील मत्‍यपालन 63 गावे मिळून 1 युनिट मधुमक्षीकापालन पाच तालुके मिळून 279 युनिट ॲडजेस्‍टमेंट नुसार निधीची उपलब्‍धता, शेडनेट 63 गावे 33 युनिट बंदीस्‍त शेती पालन 63 गावात 93 युनिट असे लक्षांक पाच वर्षाच्‍या नियोजनाचे तालुकास्‍तरावर कृषी अधिकारी यांना देण्यात आलेले आहे. यातून शेतकऱ्यांच्‍या मागणीचे अर्ज व लक्षांक यांचा ताळमेळ लावून ड्रॉ पध्दत नुसार लाभार्थी निवड तालुका कृषी अधिकाऱ्यांना करावी लागणार आहे. यामुळे योजनेच्‍या हेतूला ब्रेक लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

निवड करताना मोठी कसरत
अगोदर या प्रकल्‍पातंर्गत ऑनलाइन रजिस्‍ट्रेशन व निवड प्रक्रिया केली जात होती. त्‍यामध्ये लक्षांक नव्‍हते आता तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी यांना बरेच अधिकार देण्यात आले आहेत. त्‍यात निवड करताना मोठी कसरत करावी लागणार आहे. परंतु शासनाच्‍या निर्देशनुसार पाच वर्षांचे नियोजनानुसार लाभार्थी निवडीची प्रक्रिया केली जाणार आहे. ज्‍यांनी ऑनलाइन अर्ज केले. त्‍यांना पुर्वसंमती मिळाली नाही. त्‍या अर्जाचा विचार यात केला लाईल. जास्‍त मागणी असल्‍यास ड्रॉ पध्दतीचा अवलंब करावा लागेल.
-रविंद्र गवई, प्र. तालुका कृषी अधिकारी, संग्रामपूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com