ती ढसा ढसा रडत होती; कारण, सर्व मागण्या पूर्ण केल्यावरही त्याने बोहल्यावर चढण्यास दिला नकार

Bride`s father gave gold chain, ring even though Groom denied for marriage
Bride`s father gave gold chain, ring even though Groom denied for marriage

अमरावती ः वरुड तालुक्‍यात असलेल्या एका गावातील युवतीचे लग्न जुळले. नातेवाइकांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला. त्यावेळी नवरदेवाला सोन्याचा गोफ व अंगठी देण्यात आली. पण लग्नाची वेळ आली तेव्हा त्याची मागणी वाढली. ती मागणी वधुपिता पूर्ण करण्यात असर्थ ठरल्याने त्या लालची नवरदेवाने चक्क लग्न करण्यासच नकार दिला. त्यामुळे त्याच्याविरुद्धची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. 

शुभम बागडे (वय 28) असे ऐनवेळी बोहल्यावर चढण्यास नकार देणाऱ्या युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. जुलै महिन्यात त्याचे एका युवतीशी लग्न जुळले होते. वधुपक्षाकडेच साखरपुडा झाला. लग्नाची तारीख निश्‍चित झाली. साखरपुड्यात वधुपित्याने शुभमला १५ ग्रॅम सोन्याचा गोफ, ७ ग्रॅमची सोन्याची अंगठी आणि तब्बल साडेपाच हजार रुपयांचा ड्रेस देऊन एकूण 1 लाख 15 हजार रुपयांचा खर्च केला. 

दरम्यान, साखरपुड्यानंतर काही दिवसातच तीन लाख रुपये हुंड्याची मागणी वरपक्षाने केली. परंतु वेळेपर्यंत एवढी रक्कम देण्यास वधुपित्याने असमर्थता दर्शवली. शुभमने आपल्या होणाऱ्या पत्नीला फोन करून विवाह करण्यास नकार कळविला. वधूपक्षाने साखरपुड्याच्या वेळी शुभमला दिलेला एक लाख पंधरा हजार रुपयांचा ऐवज परत मागितला असता, तो ऐवजही वरपक्षाने परत करण्यास नकार दिला. वरपक्षाने आपला विश्‍वासघात केला, असा आरोप वधूपित्याने वरुड पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीत केला. प्रकरणी वरुड पोलिसांनी शुभमसह वरपक्षाकडील एकूण पाच जणांविरुद्ध विश्‍वासघातासह हुंडाप्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. 

नियमानुसार पुढील कारवाई
तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली. आवश्‍यक पुरावे व माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आवश्‍यकता भासल्यास नियमानुसार पुढील कारवाई होईल. 
- मगन मेहते,
पोलिस निरीक्षक, वरुड

संपादन - राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com