गरुड, बेले बडतर्फ करणारे कोण? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 एप्रिल 2017

नागपूर - आम्ही प्रदेशचे पदाधिकारी आहोत. आपणास पक्षातून काढण्याचा अधिकार फक्त महाराष्ट्राच्या प्रभारींना आहे. त्यांनी अद्याप राजीनामा मंजूर केलेला नसल्याने आपण आजही बसपचे कायदेशीर पदाधिकारी असल्याचा दावा प्रदेश सचिव सागर डबरासे आणि मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी केला. विलास गरुड, जितेंद्र म्हैसकर, कृष्णा बेले तसेच नागोराव जयकर आपणास पक्षातून काढणारे कोण, असा सवालही त्यांनी केला. 

म्हैसकर, बेले, जयकर यांनी स्वतःच्या क्षेत्रातील एकही उमेदवार निवडून आणला नाही. जयकर यांच्या मुलाचा महापालिकेच्या निवडणुकीत दारुण पराभव झाला. फक्त स्वतःच्या नावापुढे मोठमोठी पदे लावून मिरवितात. प्रत्यक्षात कार्य शून्य आहे. विलास गरुड दीड दशकापासून प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्यकाळात आजवर महाराष्ट्रात एकही आमदार निवडून आला नाही. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी बाहेरचा कमजोर उमेदवार आयात केला. त्यांच्याकडून मोठी रक्कम उकळून पक्षविरोधी कारवाया केल्या आहेत. याच कारणामुळे बसप राज्यात कमजोर होत आहे. त्यांनी स्वतःच बंडखोरी करून विधानसभेची निवडणूक लढली. हजार मतेही ते घेऊ शकले नाहीत. त्यांच्या कार्यशैलीला कंटाळून आपण पदाचे राजीनामे प्रदेश प्रभारी खासदार वीरसिंग यांच्याकडे पाठविले होते. त्यांनी अद्याप ते स्वीकारलेले नाहीत. यामुळे आम्ही आजही बसपचे पदाधिकारी आहोत. मात्र, उपरोक्त स्थानिक नेते आम्हाला बडतर्फे केल्याचे सांगून दिशाभूल करीत आहेत. महापालिकेच्या मंगळवारी झोन सभापतीची निवडणूक गुरुवारी पार पडली. मात्र, याच चौकडीने बसपच्या उमेदवारास अर्ज मागे घ्यायला लावले व अप्रत्यक्षपणे भाजपला मदत केल्याचा आरोपही डबरासे व शेवडे यांनी केला. 

Web Title: BSP leader politics in nagpur