विजयादशमीला प्रचाराचा बिगुल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

अमरावती : विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याची तसेच चिन्हांच्या वाटपाची प्रक्रिया सोमवारी (ता.7) होणार असून, मंगळवारी विजयादशमी असल्याने या दिवसापासूनच प्रचाराचा बिगुल फुंकल्या जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या आठही मतदारसंघांत जोरदार तयारीने वेग घेतला आहे.

विविध राष्ट्रीय व राज्य पक्षांचे चिन्हे निश्‍चित आहेत. त्यामुळे अशा पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. सध्या घरोघरी भेटी देणे तसेच सभा घेण्याची मालिका सुरू आहे. काही ठिकाणी सभागृहातसुद्धा बैठका होत आहेत. प्रत्येक उमेदवाराचा विकासावर भर असून सत्तेत असलेल्यांनी गेल्या पाच वर्षांत कोणती कामे केली याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे.
येत्या दोन ते तीन दिवसांत पक्षाचे जाहीरनामेसुद्धा बाहेर येणार असून त्यात स्थानिक मुद्दे कोणते असावेत याची तयारी उमेदवारांनी केली आहे. आपल्या मतदारसंघातील सविस्तर माहिती अपडेट ठेवण्याच्या दृष्टीनेसुद्धा कार्यकर्ते कामाला लागले असून पुढच्या आठवड्यात पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या सभांना सुरुवात होणार आहे. त्यासाठी मैदाने किंवा सभागृह आरक्षित करण्याची लगबग सुरू झाली आहे. सोमवारी (ता. सात) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे कोणत्या मतदारसंघातून कोण माघार घेते, हे स्पष्ट होणार असून त्यानंतर सर्वच मतदारसंघांतील चित्र स्पष्ट होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The bugle of propaganda to Vijayadashmi