Buldana : पैनगंगेच्या पुराचे पाणी शेतांमध्ये

देऊळगाव माळी मंडळाच्या सर्वेक्षणाचे दिले तहसीलदारांनी आदेश
Buldana
Buldana sakal

मेहकर : रविवारी रात्री मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी मंडळ क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने व पेनटाकळी प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडल्याने पैनगंगेला पूर आला. शेतांमध्ये पाणी घुसल्याने सहा हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस संपूर्ण तालुक्यात बरसला. परतीच्या पावसाने खूप मोठे नुकसान झाले आहे. कोराडी ,पेनटाकळी प्रकल्पांच्या साठवण क्षेत्रात अति पाऊस पडल्याने (९९ मिलिमीटर) पेनटाकळी चे सर्व दरवाजे उघडण्यात येऊन सांडव्यातून सहा हजार ७४३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. कोराडी प्रकल्पाच्या सांडव्यातूनही मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने पैनगंगा नदीला मोठा पूर येऊन दुधा, ब्रह्मपुरी, कल्याणा, उसरण, नागझरी,बाभुळखेड, मेहकर,परतापूर, अंत्री देशमुख, बोरी ,सोनाटी आदी गावांच्या परिसरातील नदीकाठच्या शेतांमध्ये दूर अंतरापर्यंत पूराचे पाणी घुसून शेतात तलाव निर्माण झाल्याचे विदारक चित्र बघायला मिळाले.

कल्याणा येथील संतोष ठोकरे यांच्या १५ एकरातील सोयाबीन प्लॉट सह येथील इतर शेतकर्‍यांच्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे पीक मुळासकट उखडून वाहून गेले आहे.

काही भागात शेती खरडून गेली आहे. तूर, कपाशी, मका पिके जमीनीवर लोळली आहेत. सोयाबीन सोंगणीचे काम काही ठिकाणी सुरू झाले होते. येत्या पंधरा दिवसात सोयाबीन शेतकर्‍यांच्या घरात येणार होते. पण अवकाळी पाऊस व नदीपुरामुळे सहा हजार हेक्टरवरील पीक मातीमोल झाल्याचे भीषण चित्र आहे. बँकांचे कर्ज काढून,उसनवारी करून खरीप पिकांसाठी शेतकर्‍यांनी मोठा खर्च केलेला असल्याने व आता अतिपावसाने मोठी हानी झाल्याने शेतकरी चिंतातुर झाले आहेत.

देऊळगाव माळी मंडळ क्षेत्रातील गावांच्या परिसरातील कालच्या अतिवृष्टीने व नदीच्या पुरामुळे झालेल्या शेतपिकांच्या व इतर नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत मंडळ अधिकारी, तलाठी यांना आज सक्त आदेश दिले असून सर्वेक्षणाचा अहवाल आल्यावर तो वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल.

डॉ संजय गरकळ तहसीलदार, मेहकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com